VIDEO | सांगलीतील शिराळात चालत्या दुचाकीत नाग आढळला

सांगलीच्या शिराळा येथील दिग्विजय शिंदे हे त्यांच्या दुचाकी वरुन आपल्या शेतात आपल्या पायाजवळ नाग असलेला आढळला.

  • राजेंद्र कांबळे, टीव्ही 9 मराठी, सांगली
  • Published On - 13:24 PM, 17 Feb 2021
VIDEO | सांगलीतील शिराळात चालत्या दुचाकीत नाग आढळला
Sangli Snake Story

सांगली : सांगलीच्या शिराळा येथील दिग्विजय शिंदे हे त्यांच्या दुचाकी वरुन आपल्या शेतात (Snake Hide Under The Bike Seat)आपल्या पायाजवळ नाग असलेला आढळला. त्यांनी तशीच गाडी सोडून बाजूला झेप घेतली. त्यानंतर त्यांनी गाडीच्या आजूबाजूला बघितले असता त्यांना नाग आढळला नाही (Snake Hide Under The Bike Seat).

त्यांनी त्यांचे सहकारी मित्र श्रीराम नांगरे पाटील, ऋषिकेश घोडे पाटील, बंधू राजेंद्र शिंदे यांना तात्काळ फोन करुन बोलवून घेतले. यावेळी शेतात नागाचा शोध घेतला असता नाग सापडला नाही. यावेळी नाग चुकून गाडीत गेला काय? ही शंका मनात आली असता तपासून बघितले. तेव्हा नाग सीटच्या खाली असलेल्या पॅनलमध्ये अगदी दिसू नये, असा जाऊन बसला होता. यावेळी खूप प्रयत्न केल्यानंतर गाडीमधून या तरुणांनी नागाला बाहेर काढले आणि सुखरुपपणे त्याच्या अधिवासात सोडून दिले.

Snake Hide Under The Bike Seat

पाहा थरारक व्हिडीओ :

Snake Hide Under The Bike Seat

संबंधित बातम्या :

Photos : पर्यटकांच्या भेटीसाठी नागपूरमधील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय संग्रहालय सज्ज

कुत्रे फिरवण्यासाठी तगडा पगार, वर्षाकाठी 29 लाखांची ऑफर, निवृत्तीनंतर पेन्शनही