माढ्यात शरद पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत, कोणाला मिळणार उमेदवारी?

शरद पवार गटाकडून माढ्यातून अद्याप कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिल्याने धैर्यशील मोहिते पाटील नाराज आहेत. त्यामुळे शरद पवार या मतदारसंघात कोणाला उमेदवारी देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

माढ्यात शरद पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत, कोणाला मिळणार उमेदवारी?
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 4:35 PM

Mhada Loksabha : माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे शरद पवारांनी माढ्यात आपला उमेदवार अजूनही जाहीर केला नाहीये. यामागे पवारांचं काही राजकीय गणित आहे का? माढा मतदारसंघात शरद पवारांनी भाकरी फिरवल्याची चर्चा सुरु झालीये. मात्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकरांच्या भूमिकेकडे शरद पवारांचं लक्ष असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान माढ्यातून गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुखांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर शरद पवार गटाकडून संजीवराजे निंबाळकरांच्या नावाचीही चाचपणी सुरु असल्याची चर्चा आहे.

मोहित पाटील नाराज

रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी गुरुवारी वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदारसंघातील नियोजनाचा आढावा घेतला. तसंच मोहिते कुटुंबाच्या नाराजीवरही त्यांनी भाष्य केलंय.

काही दिवसांपूर्वी मोहिते कुटुंबातून उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तुतारी हाती घेण्याचं आमचं ठरलं असल्याचं जयसिंह मोहिते पाटलांनी म्हटलं होतं. दरम्यान मोहिते कुटुंबात ही नाराजी कशामुळे आहे. हे जाणून घेऊयात.

2019 च्या निवडणुकीत माढ्यातून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर खासदार झाले. निंबाळकरांच्या विजयात मोहितेंच्या खारीचा वाटा होता. मात्र कालांतरानं निंबाळकर आणि मोहितेंचे संबंध बिघडले. स्थानिक कामांवरुन श्रेयवादाची सुप्त लढाई रंगली. मधल्या काळात धैर्यशील मोहितेंनी भाजपकडून उमेदवारीच्या आशेवर तयारी केली. मात्र भाजपनं पुन्हा रणजितसिंहा निंबाळकरांना तिकीट दिल्यामुळे मोहितेंचा विरोध आहे.

भाजप उमेदवाराला अजित पवार गटाकडून विरोध

भाजप उमेदवाराला अजित पवार गटाच्या रामराजेंनीही विरोध केला आहे. मात्र, निंबाळकरांच्या उमेदवारीवर भाजप ठाम असल्याचं बोललं जात असल्यानं मोहिते हाती तुतारी घेण्याच्या पावित्र्यात आहेत.

महायुतीकडून माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आलीय. 2019 मध्ये त्यांच्यासमोर आता अजितदादा गटात असलेले संजयमामा शिंदेंचं आव्हान होतं. 2019 माढा लोकसभेत रणजितसिंह नाईक निंबाळकर विरूद्ध संजयमामा शिंदे आमनेसामने होते.

रणजितसिंह नाईक निंबाळकरांना 5 लाख 83 हजार 191 मतं मिळाली होती. तर संजयमामा शिंदे यांना 4 लाख 98 हजार 441 मतं मिळाली होती. 84 हजार 750 मतांनी संजय मामा शिंदेंचा पराभव झाला होता.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.