AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंडावरून काका-पुतण्यात जुंपली? अजितदादांच्या खोचक टीकेला शरद पवार यांचंही थेट प्रत्युत्तर

शरद पवार यांनी सत्तरच्या दशकात केलेल्या बंडावरून आता काका-पुतण्यात जुंपल्याचं चित्र आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या या बंडावर भाष्य केलं. त्यांनी वयाच्या 38 व्या वर्षी बंड केलं. मी वयाच्या 60 व्या वर्षी वेगळा निर्णय घेतला. तोपर्यंत मला थांबावं लागलं असं अजित पवार म्हणाले. त्यावर शरद पवार यांनी पलटवार केला आहे. तसेच आपलं बंड हे बंड नव्हतं असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

बंडावरून काका-पुतण्यात जुंपली? अजितदादांच्या खोचक टीकेला शरद पवार यांचंही थेट प्रत्युत्तर
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 25, 2023 | 1:11 PM
Share

प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 25 डिसेंबर 2023 : त्यांनी वयाच्या 38व्या वर्षी बंड केलं. मी वयाच्या 60 व्या वर्षी बंड केलं. वसंतदादा पाटील चांगलं काम करत होते. त्यांना त्यांनी बाजूला केलं, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. अजितदादा यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही थेट उत्तर दिलं आहे. आपलं बंड हे बंड नव्हतंच, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. तसेच आता कुणी काय केलं असेल तर त्याच्याबद्दलही तक्रार नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवार मीडियाशी संवाद साधत होते.

आमचं बंड नव्हतं. आम्ही बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण यांची विचारधार लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला. सर्वांनी बसून निर्णय घतेला होता. त्याबद्दल कुणी तक्रार करण्याची गरज नाही. आज कोणी काही केलं असेल तर त्याबद्दलही तक्रार करण्याची गरज नाही. फक्त पक्षाची निर्मिती कशी झाली? पक्षाचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.

त्यातच मला आनंद

आता माझंच ऐका कुणाचं ऐकू नका. त्यांचं बरेच वर्ष ऐकलं, असं विधान अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. गेली 10 ते 15 वर्ष बारामती आणि त्या भागात माझं लक्ष असत नाही. साखर कारखाना आणि अन्य संस्थांच्या पदावर कुणी जावं आणि कुणी जबाबादराी घ्यावी यात मी लक्ष घातलं नाही. गेल्या दहा वर्षात एकाही गोष्टीत मी लक्ष दिलं नाही. त्यामुळे कुणालाही काम करण्यात अडचण आणण्याची भूमिका घेतली नाही. परिसराचा नाव लौकिक वाढेल याची काळजी घ्यावी, असं शरद पवार म्हणाले. कुणी कुणाचं ऐकावं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पक्ष म्हणून मी नेहमी नव्या लोकांना संधी देण्याची काळजी घेतली. यात मला आनंद आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अजितदादा काय म्हणाले होते?

अजित पवार यांनी काल कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. इथून पुढे माझं ऐका. कुणाचंही ऐकू नका. त्यांचं तुम्ही बरीच वर्ष ऐकलं. आता माझं ऐका. मला असा विकास करायचा आहे, तो पाहून तुम्हीही थक्क व्हाल, असं अजित पवार म्हणाले होते. तसेच मी वयाच्या 60 व्या वर्षी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी तर वयाच्या 38 व्या वर्षीच वेगळा निर्णय घेतला होता. वसंतदादा पाटील चांगलं काम करत असताना त्यांनीही बाजूला सारण्यात आलं होतं, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा