मुंबईनं जागतिक स्तराचे खेळाडू दिलेत, येथूनही आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत

| Updated on: Oct 21, 2022 | 5:38 PM

बारामतीमध्ये चांगली टेक्नॉलॉजी तयार केली आहे.

मुंबईनं जागतिक स्तराचे खेळाडू दिलेत, येथूनही आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत
शरद पवार
Image Credit source: tv 9
Follow us on

बारामती : जगात अनेक ठिकाणी जलतरण तलाव पाहिले. बारामती येथील जलतरण तलाव हा अतिशय उत्कृष्ट आहे. याचा लाभ मुला-मुलींनी घेतला पाहिजे. देशातील स्पर्धेत खेळाडू टिकले पाहिजे. विज्ञानात बदल होत आहेत. त्याची जाण नव्या पिढीला व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. अनेक वर्ष नेहरू सेंटर याठिकाणी जगातली चांगली टेक्नॉलॉजी आणली जाते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. बारामती येथे जलतरण तलावाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

बारामतीमध्ये चांगली टेक्नॉलॉजी तयार केली आहे. नव्या पिढीनं जुण्यात येणारे बदल घेतले पाहिजे. राज्यात स्वीमिंगच्या क्षेत्रात नाव कमविणाऱ्यांना येथे बोलावलं. आपण पुढं किती जाऊ शकतो. याचा आदर्श ठेवला गेला आहे, असंही शरद पवार म्हणाले.

त्यांनी सांगितलं की, मुंबईत माझा अनेक क्रीडा संघटनांशी संबंध आहे. क्रिकेट संघटनेचा मुंबई, देशाचा, जगाचा अध्यक्ष होता. मुंबईत लक्ष केंद्रित केलं. मुंबईनं सचिन तेंडुलकर दिला. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकरसारखे मोठे खेळाडू दिलं. यांनी देशाचा नावलौकिक जगात वाढविला.

क्रिकेटमध्ये लक्ष दिल्यास दोन पैसे अधिक मिळतात. म्हणून क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं जातं. राज्यातील मुला-मुलींना राष्ट्रीय स्तरावर चांगलं काम केलं, तर राज्य सरकारतर्फे कोणताही खेळ असो. त्यात राष्ट्रीय स्तरावर चमकला असेल, तर त्याची काळजी घ्यावी लागते.

शरद पवार म्हणाले, एक दिवस मी कोल्हापूरला होता. तिथं गेल्यानंतर एक आंतरराष्ट्रीय खेळाडू मला भेटायला आले. भाऊसाहेब निंबाळकर यांचा ब्रॅडमनचा विक्रम एक रनासाठी कमी होता. उत्पन्नाचा काही साधन नाही. मी मुंबईला गेलो.देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांना काही रक्कम द्यायची. पाच लाख रुपये देण्याची व्यवस्था केली. अशाप्रकारची मदत केली जाते. बाकीच्या खेळात हे शक्य होऊ शकते. राज्य आणि केंद्र सरकारनं यात लक्ष दिलं पाहिजे.

खेळासंबंधी आस्था निर्माण केली पाहिजे. लहानपणी स्विमिंगपूल नव्हता. पुलावरून उडी मारणारे म्हणजे उत्तम खेळाडू असं मानल जायचं. अलीकडं कुणी दिसत नाही. बारामतीमध्ये कॅनाल किंवा शेजारची विहीर अशा सुविधा रहोत्या. आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पुल तयार करून होणार नाही. चांगले खेळाडू निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असं पवार यांनी सांगितलं.