…ही म्हण पवार कुटुंबीयांना लागू पडते, कशी ते सुप्रिया सुळे यांनी सांगितलं

| Updated on: Oct 21, 2022 | 2:34 PM

त्यामुळं पाण्यात पडल्यावर पोहता येते, ही म्हण पवार कुटुंबीयांना लागू पडतं.

...ही म्हण पवार कुटुंबीयांना लागू पडते, कशी ते सुप्रिया सुळे यांनी सांगितलं
सुप्रिया सुळे म्हणतात...
Image Credit source: tv 9
Follow us on

 बारामती : पवार कुटुंबातील सगळ्यांना पोहायला येतं. कारण चॉईस असा आप्शन नव्हता. बारामतीला सुटीला आलो की, अजित दादांचे वडील तात्यासाहेब दोन वर्षांपासून वीस वर्षांपर्यंत पवार कुटुंबीयांचा गृप होतो. त्यांना पोहणं हे कम्पलसरी होतं. त्यावेळी काही बारामतीत स्विमिंग पूल नव्हता. एक विहीर होती नि एक ओढा होता. विहिरीत पोहायला ढकललं जायचं. पोहता येत नसलेल्यांना डबा लावून विहिरीत ढकललं जायचं. वरून सगळे बघत राहायचे. त्या भरोशावर आम्ही पोहायला शिकलो. जास्त पोहणाऱ्यांना ओढ्यात पाठविलं जायचं. त्यामुळं माझ्या बहिणी किंवा भाऊ आम्ही कुठल्या स्विमिंग पुलमध्ये पोहायला शिकलो नाही, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

त्यामुळं पाण्यात पडल्यावर पोहता येते, ही म्हण पवार कुटुंबीयांना लागू पडतं. कारण पाण्यात पडलो नि पोहायला शिकलो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तेव्हा आम्हाला कुणी बटरफ्लाय शिकवलं नाही. पण, पोहणं ही कंप्लसरी गृप अॅक्टिव्हीटी होती.

आई मला पोहायला घेऊन जायची. शाळेसाठी आणि विद्यालयीन जीवनात स्पर्धेसाठी स्विमिंग केलं.सुप्रिया सुळे या बारामतीत जलतरण तलाव उद्घाटनाच्या निमित्तानं कार्यक्रमात उपस्थित होत्या. सहकार चळवळीचं सहकारी उपस्थित होते. वीरधवल खाडेनं दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचं 80 टक्के आयुष्य पाण्यात गेले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, काल पुरंदरचा दौरा केला. संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झालाय. अजित दादांनी राज्याच्या वतीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी दादांनी केलीय.

दोन वर्षानंतर भरगच्च कार्यक्रम होतायत. रोहितच्या मतदार संघात नुकसान झालं आहे. पुढील काही महिने पावसाचा अंदाज आहे. जानेवारीपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे काही दिवस अडचणीचे ठरतील. असेच एक जलतरण तलाव आणि फिटनेस सेंटर इंदापूरलाही उभारणार आहोत.

अजितदादांनी तीन कोटींचा निधी उपलब्ध करुन दिलाय. आम्ही सुट्टीत आलो की दादाचे वडील तात्यासाहेबांनी सगळ्यांना कंपलसरी केलं होतं. ज्यांना पोहायला येतं त्यांना ओढ्यात आणि ज्यांना येत नाही त्यांना डबा बांधून विहिरीत ढकललं जायचं, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली.