AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांनी पुढारी व्हावं, असं तुकाराम मुंढेंना का वाटतं? काय आहे या मागचं कारण?

अधिकारी तुकाराम मुंढे कठोर शिस्तीसाठी प्रसिद्ध आहेत, तरी त्यांना आपली मुलं आयएएस अधिकारी बनण्याऐवजी राजकारणी किंवा उद्योजक व्हावीत असं वाटतं. प्रशासकीय बंधनांशिवाय समाजाची मनमोकळेपणे सेवा करता यावी, हे यामागचं मुख्य कारण आहे. सततच्या बदल्यांमुळे कुटुंबाला झालेल्या त्रासातूनही ते मुलांना वेगळ्या वाटेवर जाण्याचा सल्ला देतात.

मुलांनी पुढारी व्हावं, असं तुकाराम मुंढेंना का वाटतं? काय आहे या मागचं कारण?
tukaram mundheImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2026 | 5:02 PM
Share

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना भलेभले कापत आहेत. तुकाराम मुंढे ज्या खात्यात जातात तिथल्या लोकांना त्यांचा धाक बसतो. आता अन्न आणि औषध प्रशासन विभागात आल्यावर त्यांनी रस्त्यावरच्या ठेल्यांपासून ते बड्या रेस्टॉरंटपर्यंतच्या मालकांना सळो की पळो करून सोडलं आहे. नागरिकांच्या आरोग्याशी हयगय करणाऱ्यांना त्यांनी आपल्या पदाचा चांगलाच खाक्या दाखवला आहे. त्यामुळे अधिकारी असावा तर तुकाराम मुंढे यांच्यासारखाच, अशी चर्चा रंगली आहे. अनेक तरुण मुलंही तुकाराम मुंढे यांच्याप्रमाणेच आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहत आहेत. मात्र, तुकाराम मुंढे यांना आपली मुलं राजकारणी व्हावीत असं वाटतंय. त्यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलंय.

तुकाराम मुंढे यांनी एका मुलाखतीत आपली ही इच्छा व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ते बोलत होते. तुमच्याप्रमाणेच तुमची मुलं प्रशासकीय सेवेत जावेत, असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल त्यांना करण्यात आला होता. त्यावर त्यांनी थेट नाही म्हणून सांगितलं. भविष्यात माझी मुलं पुढारी किंवा उद्योजक व्हावीत असं मला वाटतं. त्यांनी राजकारण किंवा व्यापारात रमावं असा मी त्यांना सल्ला देईन. आजच्या जेनजीने असे काही मार्ग निवडले पाहिजे की, जिथे तुमच्यावर कोणतीही प्रशासकीय बंधने नसतील. समाजासाठी तुम्ही कोणत्याही दबावाशिवाय आणि मनमोकळेपणे काम करू शकाल, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले?

माझ्या मुलांनी जर मला विचारलं त्यांनी प्रशासकीय अधिकारी व्हावं का? तर मी त्यांना थेट सांगेल, अजिबात बनू नका, असं मुंढे म्हणाले. मुंढेंना आपली मुलं उद्योजक किंवा पब्लिक लीडर बनावीत असं वाटतं. कारण सिस्टिमच्या कोणत्याही दबावाशिवाय त्यांना समाजाच्या विकासात योगदान देता येईल. जनसेवा करण्यासाठी राजकारण आणि उद्योग ही दोन क्षेत्र अत्यंत चांगली आहेत. आजच्या युवा पिढीकडे अमर्यादित ऊर्जा आणि ज्ञान आहे. त्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य चौकटीत अडकून जाईल, अशा करिअरमध्ये या मुलांनी अडकून पडू नये, असं मुंढे म्हणाले.

21 वर्षात 25 बदल्या

तुकाराम मुंढे यांच्या 21 वर्षात 25 बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणाचा फटका त्यांच्या कुटुंबीयांनाही बसला आहे. त्यांच्या मते, त्यांचा मुलगा 5वीत जाईपर्यंत त्यांना सहावेळा शाळा बदलावी लागली. त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे त्यांच्या पत्नीलाही मोठा त्रास झाला. जनसेवेचा हा कठिण मार्ग मीच निवडला होता. मी या कठिण प्रसंगांना तोंड द्यायला तयार होतो, असं ते म्हणाले. पण या काळात त्यांच्या कुटुंबीयांना मोठा त्याग करावा लागला. त्यामुळेच त्यांना आपल्या मुलांनी या मार्गाने जाऊ नये असं वाटतं.

Follow Us
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्
Tiger Shroff Case : टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट समोर; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्.....
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी...
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; फोन करणारा कोण?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट गणेश नाईकांकडे धाव
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात...
Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष
टायगर श्रॉफला भेटले मात्र...; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
Ram Purneker On Tiger Shroff Car : टायगर श्रॉफला भेटले मात्र आमच्यासाठी वेळ नाही; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी...
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान;
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान; म्हणाले...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी हतबल