AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट एकटे नाहीत, पुणेकरांचा मोठा पाठिंबा, रविवारी DJ विरोधात मोर्चा धडकणार, अपडेट काय?

Rahul Sawant on DJ And Vidyanand Bapat: डीजेविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांच्या पाठीशी आता पुणेकर एकवटले आहे. काल त्यांना मारहाण झाल्यानंतर पुणेकरांनी आता आवाज बुलंद केला आहे. रविवारी डीजे मुक्तीसाठी पुणेकरांनी एल्गार पुकारला आहे. काय आहे याविषयीची मोठी अपडेट?

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट एकटे नाहीत, पुणेकरांचा मोठा पाठिंबा, रविवारी DJ विरोधात मोर्चा धडकणार, अपडेट काय?
विद्यानंद बापट, राहुल सावंतImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 04, 2026 | 10:27 AM
Share

DJ आणि लाऊडस्पीकरवरील गोंगाटाविरोधात पुण्यातील विद्यानंद बापट या सामान्य नागरिकांच्या बोलक्या लढ्याला आता पुणेकरांचे बळ मिळाले आहे. काल ते टीव्ही 9 मराठीशी संवाद साधत असताना, त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पुणेकरांनी त्यांच्या बाजूने आवाज बुलंद केला आहे. त्यांच्या मारहाणीविरोधात राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी निषेध केला. पण काही सामाजिक भान असलेल्या पुणेकरांनी कृतीतून त्यांच्या विचारांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. पुण्यात रविवारी नागरिक डीजे मुक्तीसाठी मोर्चा काढणार आहेत.

रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात रविवारी डीजे मुक्तीसाठी पुणे महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सावंत यांनी बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. डीजे विरोधात आंदोलन जाहरी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. रविवारी सकाळी 11 वाजता बालगंधर्व चौकात, झाशीची राणी पुतळ्याजवळ एकत्र येऊन पुणेकर डीजे मुक्तीविरोधात आवाज बुलंद करणार आहेत. सावंत यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे पुणेकरांना मोठे आवाहन केले आहे.

बापट यांना पाठिंबा

विद्यानंद बापट यांच्या भूमिकेचे अनेक पुणेकरांनी समर्थन केले आहे. तर सावंत यांनी सुद्धा व्हिडिओ शेअर करत बापट यांना पाठिंबा जाहीर केला. बापट यांच्या मताशी सहमत असल्याचे आणि त्यांना पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. टिळक रोड परिसरात काल बापट यांना संतोष चव्हाण या तरुणाने मारहाण केली होती. हा सर्व प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर टीव्ही 9 चे कॅमेरामन आणि इतर पत्रकारांनी बापट यांचा बचाव केला. चव्हाण याला रोखण्याचा प्रयत्न केला.

सवंग प्रसिद्धीसाठी हा हल्ला केल्याची प्रतिक्रिया बापट यांनी दिली होती. तसेच त्यांनी लढा सुरूच ठेवण्याचे स्पष्ट केले होते. त्यांना झालेल्या मारहाणीचा राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील अनेकांनी निषेध व्यक्त केला. त्यांनी हल्लेखोरावर कडक कारवाईची मागणी केली. तर काहींनी बापट यांच्या भूमिकेचे समर्थन केले. आता पुणेकर सुद्धा डीजेमुक्तीसाठी एकवटल्याचे दिसून येते.

Follow Us
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना...
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा!
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी...
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी सजलेला गाभारा पाहून भाविक मंत्रमुग्ध
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर येताच खळबळ
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?