AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: ‘वाघ आमच्या इशाऱ्याने चालतो’, भाजप नेत्यांसमोर विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला टोला

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमधील ओबीसी चिंतन बैठकीत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावलाय.

VIDEO: 'वाघ आमच्या इशाऱ्याने चालतो', भाजप नेत्यांसमोर विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला टोला
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 27, 2021 | 7:11 PM
Share

पुणे : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळा येथील ओबीसी चिंतन बैठकीत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावलाय. मंचावरील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडे पाठवा असं सांगितलं. त्यावर वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे छोचक टोला लगावला (Vijay Wadettiwar comment on Shivsena indirectly over political control).

विजय वडेट्टीवार यांनी मी अशा भागातील राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही, असं म्हटलं. यावर मंचावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा असं सांगितल्या. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

“जेवढे पैसे सारथी मिळतील, तेवढेच पैसे महाज्योतीला मिळतील, मी बसलोय इथे”

“कोरोना लाट गेली की ओबीसींचा पहिला विराट मोर्चा औरंगाबाद येथे होणार आहे,” अशीही घोषणा यावेळी विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली. तसेच जेवढे पैसे सारथी मिळतील, तेवढेच पैसे महाज्योतीला मिळतील. मी बसलोय इथे, असं म्हणत ओबीसींसाठीच्या निधीसाठी त्यांनी दंड थोपटले.

“मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य, पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू”

विजय वडेट्टीवार म्हणाले, “मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे. पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहे. ओबीसींवर अन्याय झालाय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल. प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही. बावनकुळे साहेब, माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही. मी समाजासाठी झुकायला आणि वाकायला तयार आहे.

“आपलं अडले, तर सगळ्यांनाच बाप म्हणावं लागतं, वेळ आली तर पंतप्रधानांच्या पाया पडू”

“मला रोज धमक्या येतात, त्या टोकाच्या येतात. धमक्या देणाऱ्यांनो, आम्ही तुमच्या विरोधात नाही आणि राहणारंही नाही. माझं काय होईल ते होईल, पण ओबीसींच्या मुद्यावर मी शांत बसणार नाही. आपलं अडले, तर सगळ्यांनाच बाप म्हणावं लागतं. फडणवीस साहेबांना घेऊन जाऊ. वेळ पडली तर पंतप्रधानांच्या पाया पडू. या आठवड्यात आयोगाला पत्रव्यवहार करु, त्यांना डाटा गोळा करायला हवं ते देऊ,” असंही त्यांनी नमूद केलं.

संबंधित व्हिडीओ पाहा :

Vijay Wadettiwar comment on Shivsena indirectly over political control

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!