AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणं पुन्हा हादरलं! उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, प्रॉपर्टी हवी म्हणून केलं जायचं टॉर्चर!

पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथे शिल्पा सचिन गवारे या विवाहित महिलेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. जमीन खरेदीसाठी २ कोटींची मागणी, शारीरिक व मानसिक छळ, यामुळे उच्चभ्रू कुटुंबातील महिलेने टोकाचे पाऊल उचलले. गेल्या वर्षीच्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची ही दुःखद पुनरावृत्ती असून, हुंडाबळीने पुन्हा एकदा शहर हादरलं.

पुणं पुन्हा हादरलं! उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, प्रॉपर्टी हवी म्हणून केलं जायचं टॉर्चर!
pimpri chinchwad case
| Updated on: Aug 27, 2026 | 5:23 PM
Share

गेल्या वर्षी पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येने अख्खं राज्य सुन्न झालं होतं. जमीन खरेदी करण्यासाठी तुझ्या घरच्यांकडून दोन कोटी रुपये घेऊन ये असा तगादा तिच्या सासरच्या मंडळींनी लावला होता. तसेच तिचा शारीरिक तसेच मानसिक छळ केला जात होता. या प्रकरणामुळे राज्य धगधगत होतं, मात्र याच- अशाच गोष्टीची आता पुनरावृत्ती झाली असून हुंडाबळी प्रकरणाने पुन्हा शहर हादरलं आहे. वैष्णवी हगवणे नंतर आता ही घटना समोर आली असून पिंपरी-चिंचवड येथील उच्चभ्रू कुटुंबात हा प्रकार घडलाय. शिल्पा सचिन गवारे नामक विवाहीत महिलेचा मृत्यू झाला असून तिने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे.

विवाहीत महिलेच्या भावच्या फिर्यादीवरून तिचा पती, सासू, सासरे आणि दीर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाकडमधील शिल्पा गवारेने टोकाचं पाऊल उचललं. माहेरच्या संपत्तीत हिस्सा माग असं म्हणत शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. वाकड पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

याप्रकरणी मयत शिल्पा यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पती सचिन गवारे सह सासू,सासरे आणि दिरा विरुद्ध हुंडाबळी आणि छळवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा माग असं म्हणत पती आणि सासरच्या मंडळीकडून माझ्या बहिणीला खूप मारहाण केली जात होती, असा आरोप शिल्पाच्या भावाने केला आहे.

माझी बहीण नाहीये आता मला राखी बांधायला, गेली ती..

याप्रकरणी शिल्पाच्या भावाने जे सांगितलं ते ऐकून कोणाच्याही डोळ्यांत अश्रू येतील.काय शब्दांत सांगू मी माझ्या भावाा हो.. उद्या रक्षाबंधनाचा सण, पण माझी बहीण नाहीये आता हो राखी बांधायला.  आज गेली ती शेवटची सोडून आम्हाला आज. तिची छवणूक करून करून मारलं हो तिला सासरच्या लोकांनी.. हे बोलताना तो भाऊ अक्षरश: ढसाढसा रडला.

खूप छळ केला हो त्यांनी, तो उत्तम गवारे, संजीवनी गवारेंनी खूप रात्रीचं टॉर्चर केलं हो तिला, खूप  त्रास दिला., दारू पिऊन यायचा, लई त्रास दिला हो माझ्या बहिणीला त्यांनी असा आरोप मृत शिल्पाच्या भावाने केला. मला रात्री भावाचा फोन आला, गडबड झालीये, हॉस्पिटलमध्ये ये असं सांगितलं मला, तिथे गेलो तर माझी बहीण स्ट्रेचरवर पडलेली होती, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.  नक्की काय झालयं, क्षणभर मला काहीच कळत नव्हतं हो, असंही तिच्या बावाने नमूद केलं.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...