AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झोपेत असलेल्या पतीवर पत्नीने उकळते पाणी टाकले, कारण वाचून बसेल धक्का

Pune Crime News : पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. झोपेत असलेल्या पतीवर पत्नीने उकळते पाणी टाकले. या पत्नीस पतीवर कशामुळे राग आला, त्याचे कारण वाचून बसेल धक्का...

झोपेत असलेल्या पतीवर पत्नीने उकळते पाणी टाकले, कारण वाचून बसेल धक्का
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 14, 2023 | 10:02 AM
Share

योगेश बोरसे, पुणे, दिनांक 14 जुलै 2023 : पती, पत्नीचे नाते सात जन्माचे असते, असे म्हटले जाते. परंतु त्यांच्यामध्ये नोकझोक होत राहते. भांडणे होत राहतात. अन् पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने संसाराचा गाडा ते सुरु करतात. परंतु पुणे शहरात वेगळीच घटना घडली. पत्नीने पतीवर उकळते पाणी टाकले आहे? एका क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीवर उकळते पाणी टाकले आहे. या घटनेत पती गंभीर जखमी झाला. या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात गेली. मग पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील या पत्नीला कशामुळे हा संताप आला…

काय घडली घटना

पुण्यातील वारजे भागात धक्कादायक घटना घडली. महादेव जाधव (वय ३०, रा. काजल हाइट्स, शिवणे) हे त्यांच्या पत्नीसह राहतात. त्यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. माधव जाधव नेहमीप्रमाणे झोपले होते. पहाटे ३.३० वाजता त्यांच्या पत्नीने त्यांच्या अंगावर उकळते पाणी टाकले. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिवणे परिसरात घडली. या घटनेत महादेव जाधव गंभीररीत्या भाजला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

काय आहे कारण

महादेव जाधव यांनी त्यांच्या पत्नीच्या भावाला २ लाख ४० हजार रुपये उधार दिले होते. पत्नीच्या भावाला दिलेले हे पैसे ते सतत मागत होते. त्यावरुन दोन्ही पती, पत्नीमध्ये भांडणही होत होते. त्यामुळे रागाच्या भरात पत्नीने पहाटे साडेतीन वाजता महादेव जाधव झोपले असताना त्यांच्यावर उकळलेले पाणी टाकले. त्यात ते ५० टक्के भाजले गेले. याबाबत महादेव जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून वारजे पोलिस ठाण्यात पत्नीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक... आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?
ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
Amit Thackeray | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील...
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील सूचनेनुसार...
39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
Pratap Sarnaik | 39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला...
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला दिली आठवड्याची मुदत
उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील!
Naveet Rana | उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील! नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल
मुंबई महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन सक्रिय? चक्क...
मुंबई महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन सक्रिय? चक्क... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली!
ठाकरेंच्या शिवतीर्थावर राऊत दाखल; बंद दाराआड चर्चा, नेमकं काय शिजतंय?
Sanjay Raut Meet Raj Thackeray | राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर संजय राऊत दाखल; बंद दाराआड तासभर चर्चा, नेमकं काय शिजतंय?
E20 बाबत मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाने पेट्रोलमधील इथेनॉलच्या...
E20 बाबत मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाने पेट्रोलमधील इथेनॉलच्या टक्केवारीची याचिका...
पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचं प्रमाण द्या! कोर्टाने याचिका फेटाळली, पण
Supreme Court | पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचं प्रमाण द्या! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, पण...