AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर उगारले ‘ब्रम्हास्त्र’, पुण्यातील गुन्हेगारी मोडण्याचा निश्चय

Pune crime News : पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर धडक कारवाई सुरु केली आहे. शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे असलेले 'ब्रम्हास्त्र' बाहेर काढले आहे. २० जणांवर कठोर कारवाई केली आहे.

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर उगारले 'ब्रम्हास्त्र', पुण्यातील गुन्हेगारी मोडण्याचा निश्चय
CP Ritesh Kumar
| Updated on: Jul 13, 2023 | 4:45 PM
Share

पुणे, दिनांक 13 जुलै 2023 : पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. पुणे अन् पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांची तोडफोड होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये व्यापाऱ्यांवर कोयताने हल्ला झाला आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ॲक्सन मोडमध्ये आले आहे. गेल्या दोन तीन दिवसांत पोलिसांनी तब्बल दीड हजार गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. पुणे शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यानंतर शनिवारी पोलिस आयुक्त रितेश कुमार रस्त्यावर उतरले. त्यावेळी तब्बल १६५ गुन्हेगारांना अटक केली गेली. आता पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘ब्रम्हास्त्र’ बाहेर काढले आहे. या ‘ब्रम्हास्त्र’ चा वापर करुन २० जणांवर कारवाई केली गेली आहे.

कोणावर झाली कारवाई

पोलिसांनी अट्टल गुन्हेगारांवर मकोकाची कारवाई केली आहे. त्यात दत्ता दीपक जाधव (२७), सचिन बबन अडसूळ (२९), ऋषिकेश उर्फ ​ऋषी राजू शिंदे (२४), अमित बाबू धावरे (२२), गणेश उर्फ ​​दोडया अनंत काथवटे (२२, सर्व रा. सहकार) यांच्यावर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे. प्रवीण बिभीषण जाधव (वय 34, रा. संत नगर, पुणे), ऋषिकेश रवी मोरे (वय 24, रा. पर्वती), बबन अडसूळ (वय 53, रा. अरण्येश्वर), मनोज उर्फ ​​भुन्मय उर्फ ​​भैया किसन घाडगे (वय 26, रा. पार्वती), गणेश दीपक जाधव (28), अक्षय मारुती दासवडकर (27), अर्जुन उर्फ ​​रोह्या संतोष जोगळे (19), रोहित उर्फ ​पप्पू भगवान उजगरे (20), शेखर उर्फ ​सोनू नागनाथ जाधव (30) यांचा समावेश आहे. या सर्वांना मकोका लावण्यात आला. तसेच चार अल्पवयीन आणि दोन फरार आरोपींवर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे.

का केली कारवाई

दीपक जाधव याने गँग तयार केली होती. अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये त्याचा हात होता. शहरात दहशत निर्माण करण्याचे काम तो करत होता. दत्तवाडी पोलीस ठाणे, सावंतवाडी पोलीस ठाणे, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे अंतर्गत आरोपींनी दहशत निर्माण केली होती. त्यात काही जणांनी गाड्याही फोडल्या होत्या. आरोपींवर यापुढेही धडक कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.