Vidyanand Bapat : गणपतीच्या आरतीला जाणार का? विद्यानंद बापट यांचे उत्तर काय? खरंच ते नास्तिक आहेत का?

Vidyanand Bapat on Ganesh Aarti: डीजेविरोधात जबरदस्त भूमिका घेणारे विद्यानंद बापट हे सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. त्यांच्या भूमिकेला आता नागरिकांमधूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण ते नास्तिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. गणपतीच्या आरतीसाठी जाणार का? असा सवाल विचारल्यावर त्यांनी काय दिलं उत्तर?

Vidyanand Bapat : गणपतीच्या आरतीला जाणार का? विद्यानंद बापट यांचे उत्तर काय? खरंच ते नास्तिक आहेत का?
विद्यानंद बापट, गणेशोत्सव
| Updated on: Sep 04, 2026 | 12:17 PM

डीजे आणि सणउत्सवातील गोंगाटाविरोधात विद्यानंद बापट यांनी जोरदार भूमिका मांडली आहे. त्यांच्या तार्किक भूमिकेचे आता नागरिकही समर्थन करत आहेत. तर काही लोकांनी त्यांना विरोधही केला आहे. ते नास्तिक असल्याचा डाव्या विचारसरणीचे असल्याचा युक्तीवाद करण्यात येत आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली असता, त्यांनी गणपती मंडळाकडून आरतीसाठी विचारणा झाल्याची माहिती दिली. त्यावर तुम्ही गणपतीच्या आरतीला जाणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर बापट यांनी असं उत्तर दिलं.

त्या गणपती मंडळाचं केलं कौतुक

विद्यानंद बापट यांनी सांगितलं की, काल पुण्यातील एका गणपती मंडळाचं कार्यकर्ते त्यांना भेटायला आले होते. हे मंडळ पारंपारिक वाद्य वाजवते. गणेश मंडळ कुठल्याही प्रकाराचा गोंगाट करत नाही. अगदी साधेपणाने आणि पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव ते साजरे करतात. तर ढोल पथकाची तालीमही ते एका नदीच्या पात्रात घेतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा कुणाला ही त्रास होत नाही. या मंडळाने माहिती दिल्यावर आपण त्यांचे कौतुक केल्याचे विद्यानंद बापट यांनी सांगितले.

गणपतीच्या आरतीला जाणार का?

तर या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यानंद बापट यांना गणेशोत्सवात आरतीला येण्याचे आग्रही निमंत्रणही दिले. त्यावर बोलताना बापट यांना माध्यमांनी तुम्ही या मंडळाच्या आरतीला जाणार का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा बापट यांनी आपण डाव्या विचारसरणीचे आहोत हे मान्य केलं. तर त्याचवेळी आपण नास्तिक असल्याचीही माहिती त्यांनी दिली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केली तेव्हा आपण नास्तिक असल्याचे माहिती त्यांनी दिली. त्यामुळे गणपतीच्या आरतीला जाणार की नाही याचे अप्रत्यक्ष उत्तर बापट यांनी दिले. यावेळी त्यांनी डीजे आणि गोंगाटाविरोधातील आपली भूमिका सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान रविवारी सकाळी 11 वाजता बालगंधर्व चौकात, झाशीची राणी पुतळ्याजवळ एकत्र येऊन पुणेकर डीजे मुक्तीविरोधात आवाज बुलंद करणार आहेत. अनेक पुणेकरांनी बापट यांना पाठिंबाही जाहीर केला आहे. त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us