AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपक केसरकरांचा आग्रह होता म्हणूनच भोंदू खरातकडे गेलो; राधाकृष्ण विखे पाटलांनी अंग झटकलं

Ashok Kharat : भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदू खरातबाबत मोठी माहिती दिली आहे. मी दीपक केसरकरांचा आग्रह होता म्हणूनच भोंदू खरातकडे गेलो होतो असं विधान केलं आहे.

दीपक केसरकरांचा आग्रह होता म्हणूनच भोंदू खरातकडे गेलो; राधाकृष्ण विखे पाटलांनी अंग झटकलं
vikhe kharatImage Credit source: Google
| Updated on: Apr 15, 2026 | 5:05 PM
Share

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातला महिलांचे लैंगिक शोषण, भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात काही राजकारणी लोकांचीही नावे असल्याचे समोर आले आहे. यात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर हे अशोक खरातच्या संपर्कात होते अशी माहिती समोर आली आहे. तसेच इतरही अनेक नेत्यांशी संबंधित लोक खरातच्या संपर्कात असल्याचेही समोर आले आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदू खरातबाबत मोठी माहिती दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

अनेक महिला खरातच्या वलयाला बळी पडल्या

राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, पहिला गुन्हा आम्ही दाखल केला, म्हणून हे प्रकरण उघडकीस आलं. आता जी नावे समोर येत आहेत, त्यांची SIT चौकशी करेल. त्याने एक अवतार धारण केला होता, तो अवतार समोर आला आहे. त्यासाठी लोकांना दोष देऊ नये. अनेक महिला या त्याच्या वलयाला बळी पडल्या. अंजली दमानिया यांनी केलेले आरोप चौकशीत समोर येतील. अनेकांचे पाय धुताना फोटो आहेत, भाषण करताना नावं आलेले आहेत.

चौकशीतून अनेक गोष्टी समोर येतील – विखे पाटील

पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की, आपल्या भागातील माणूस देवाचा अवतार होतो आहे असं म्हणून शिर्डीतील काही लोक बळी पडले. समता पतसंस्था प्रकरणात जबाब नोंदवले गेले आहेत. खरात स्वतः अकाउंट उघडायचा आणि ऑपरेट करायचा याबाबत गोष्टी चौकशीत समोर येईल. अनेक महिलांना फसवण्यात आलं. अज्ञानाने घडलेल्या गोष्टी आणि माहिती असून तिथे जाणं यात फरक आहे. माहिती असताना कोणी गेल नसतं. इथून पुढे कोणी भविष्य सांगायला आलं, तर आधी त्याचं भविष्य बघावं लागेल.

मी दीपक केसरकरांच्या आग्रहामुळे गेलो होतो – विखे पाटील

अंजली दमानिया यांच्याकडे भरपूर माहिती असेल, रोज नवीन प्रकार समोर येत आहेत, आरोप होत आहेत. SIT चौकशी करत आहे. जे दोषी असतील, ते मोठ्या पदावर असले तरी कारवाई झाली पाहिजे. दीपक केसरकर यांचा आग्रह होता, म्हणून मी गेलो होतो. काही गोष्टी अज्ञानाने झाल्या आहेत, IG त्या ठिकाणी गेले, अनेक लोकांचे CDR आहेत, मात्र चौकशी निष्पक्ष होणार आहे. IG गेले, मात्र जाणीवपूर्वक कोणी गेलं तर ते गंभीर आहे. माझं भविष्य लोक ठरवतात. मी हात दाखवून अवलक्षण करत नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...