Sharad Pawar : पुढच्या तीन दिवसात महत्वाची राजकीय घडामोड, मोठा नेता शरद पवारांची साथ सोडू शकतो

Sharad Pawar : सध्या बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. पण या दरम्यान काही महत्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात. एक मोठा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊ शकतो.

Sharad Pawar : पुढच्या तीन दिवसात महत्वाची राजकीय घडामोड, मोठा नेता शरद पवारांची साथ सोडू शकतो
Sharad Pawar
| Updated on: Apr 17, 2026 | 2:19 PM

पुढच्या तीन दिवसात भाजपकडून शरद पवार यांना राजकीय धक्का बसू शकतो. अहिल्यानगर जिल्ह्यात एक मोठी राजकीय घडामोड घडू शकतो. सध्या अहिल्यानगरच्या राहुल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरु आहे. आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. भाजपने राहुरीमध्ये शिवाजीराव कार्डिले यांचे सुपूत्र अक्षय कार्डिले यांना उमेदवारी दिली आहे. शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा होती. प्राजक्त तनपुरे यांनी ही पोट निवडणूक लढवू नये अशी देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांची इच्छा होती. त्यानुसार प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे शरद पवार यांनी राहुरीमधून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली.

आता शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 20 तारखेला भूमिका जाहीर करणार अशी माहिती आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्राजक्त तनपुरे निर्णय घेणार असं समजतय. तनपुरे भाजपा प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे वीस तारखेला कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष. ‘माझी भूमिका मी सहा तारखेला स्पष्ट केली, मात्र आमचे काही कार्यकर्ते नाराज, त्यामुळे मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट करणार’ असं तनपुरे म्हणाले. राहुरी पोटनिवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी घेतली होती भेट. भेटीनंतर अर्ज न भरण्याचा घेतला तनपुरे यांनी निर्णय घेतला होता. आता अक्षय कर्डिले यांना थेट पाठिंबा देणारा का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्यांना मानणारा मोठा वर्ग

प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी खिल्ली उडवली होती. पण तेच विखे आता तनपुरे यांची भरभरुन स्तुती करत आहेत. राहुरी तालुक्यातील नगरपालिका, बाजार समिती, साखर कारखाना अशा प्रमुख संस्थांवर प्राजक्त तनपुरे यांचं वर्चस्व आहे. तनपुरे कुटुंबाला राहुरीमध्ये मान,सन्मान आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास भाजपचं बळ वाढेल.

 

Follow Us