AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यानंतर आता रायगडची जागाही बिनविरोध, तटकरेंचा मोठा डाव, पुत्र होणार आमदार!

ठाण्यापाठोपाठ आता कोकणातील रायगड आणि यवतमाळ विधान परिषदेची निवडणुक बिनविरोध होणार आहे. महायुतीला या जागा बिनविरोध करण्यात यश आले आहे.

ठाण्यानंतर आता रायगडची जागाही बिनविरोध, तटकरेंचा मोठा डाव, पुत्र होणार आमदार!
sunil tatkare and aniket tatkareImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 04, 2026 | 3:35 PM
Share

Raigad Vidhan Parishad Election : राज्याज्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. एकूण 17 जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. दरम्यान, आता या निवडणुकीतील अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत संपत आलेली आहे. त्यामुळे बंडखोर नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाशिक विधानपरिषदेची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आलेली आहे. या जागेवरून गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, एकीकडे महायुतीत काही जागांवर बंडखोर निवडणूक लढवण्यावर ठाम असताना दुसरीकडे ठाण्यापाठोपाठ रायगड या जागेसाठी महायुतीला मोठे यस आलेले आहे. येथे रायगडची जागा बिनविरोध होणार असून त्या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार अनकेत तटकरे हे आता आमदार होणार आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यापाठोपाठ आता कोकणातील रायगड ही जागा आता बिनविरोध होणार आहे. ही जागा बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केला जात होते. ही जागा राष्ट्रवादीला सुटली होती. राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आता त्यांच्याविरोधात कोणताही उमेदवारी निवडणुकीसाठी उभा नाही. त्यामुळे आता ही जागा बिनविरोध होणार आहे.

रायगडच्या जागेवरून झाला होता वाद

दरम्यान ही जागा मिळवण्यासाठी महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळाले. ही जागा आम्हालाच मिळावी यासाठी शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांनी पूर्ण ताकद लावली होती. काहीही झालं तरी ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे, असे या नेत्यांचे मत होते. परंतु शेवटी ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. त्यानंतरही शिवसेनेचे नेते आक्रमक झाले होते. राष्ट्रवादीला जर ही जागा जात असेल तर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आम्हाला म्हणजेच शिवसेनेला मिळायला हवे, असे मत मत गोगावले तसेच शिवसेनेच्या इतर नेत्यांनी व्यक्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना आमदारकी देण्याच्या बदल्यात गोगावले यांना पालकमंत्रिपद दिले जाईल, असे ठरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात कुठे कुठे निवडणूक बिनविरोध

राज्यात रायगड जागेसह पुणे, यवतमाल, ठाणे, चंद्रपूर, अहिल्यानगर या जागाही बिनवविरोध झाल्या आहेत. म्हणजेच एकूण सतरा जांगपैकी 6 जागांवर काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत6

Follow Us
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?