AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राण्याचा मृतदेह समजून दुर्लक्ष केले, पण जवळ जाऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली, कर्जत-खोपोली हायवेवर काय घडलं?

रायगड जिल्ह्यातील कर्जत-खोपोली महामार्गावरील पळसदरी येथे एका खड्ड्यात ३५ ते ४० वर्षीय अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्राण्याचा मृतदेह समजून दुर्लक्ष केले, पण जवळ जाऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली, कर्जत-खोपोली हायवेवर काय घडलं?
raigad
| Updated on: May 31, 2026 | 1:57 PM
Share

रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जत-खोपोली महामार्गावरील पळसदरी ते तळवली गावादरम्यान रस्त्यालगत असलेल्या एका खड्ड्यात अंदाजे ३५ ते ४० वर्षीय अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण कर्जत तालुक्यात आणि पळसदरी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्राथमिकदृष्ट्या हा घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पळसदरी-तळवली दरम्यानच्या महामार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि स्थानिक गावकऱ्यांना परिसरात तीव्र दुर्गंधी येत होती. सुरुवातीला एखाद्या प्राण्याचा मृतदेह असावा असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, रविवारी दुर्गंधीचा त्रास असह्य झाल्याने काही नागरिकांनी रस्त्याच्या कडेला जाऊन पाहणी केली. त्यावेळी रस्त्यालगत असलेल्या एका खोल खड्ड्यात एका महिलेचा मृतदेह अत्यंत छिन्नविच्छिन्न आणि कुजलेल्या अवस्थेत तरंगताना दिसला. हा प्रकार पाहताच नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती कर्जत पोलीस ठाण्याला दिली.

५ ते ६ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज

घटनेचे गांभीर्य ओळखून कर्जत पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला आणि घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला. हा मृतदेह अत्यंत कुजलेल्या आणि छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याने महिलेचा मृत्यू नेमका कधी आणि कसा झाला, हे अद्याप समजलेले नाही. मात्र, मृतदेहाची अवस्था पाहता हा मृत्यू साधारणपण ५ ते ६ दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सध्या या मृत महिलेची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. ही महिला साधारण ३५ ते ४० वर्षांची असून तिच्या अंगावर कुर्ती आणि निळ्या रंगाची पँट आहे. तिच्या उजव्या हातात एक बांगडी आढळून आली आहे. पोलिसांनी या सर्व बाबींची नोंद घेतली असून रायगड जिल्ह्यासह शेजारील ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता महिलांच्या तक्रारींची पडताळणी सुरू केली आहे.

आकस्मिक मृत्यूची नोंद

या महिलेचा मृत्यू नैसर्गिक आहे, अपघाती आहे की घातपातातून झाला, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नाही. मात्र, मृतदेह ज्या पद्धतीने महामार्गालगतच्या निर्जन ठिकाणी खड्ड्यात टाकून देण्यात आला होता, ते पाहता अज्ञात आरोपींनी महिलेची इतर कुठे तरी हत्या करून, पुराव्यांचा नाश करण्याच्या उद्देशाने मृतदेह या ठिकाणी आणून फेकला असावा, असा संशय पोलिसांना आहे.

कर्जत पोलिसांनी सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची (ADR) नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post-Mortem) शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि त्यानुसार पुढील कलमे लावून गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा