AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad Crime: माथेरानमध्ये हत्या झालेल्या महिलेची ओळख पटली, चारित्र्याच्या संशयावरुन पतीनेच काढला पत्नीचा काटा

गेल्या सात महिन्यांपूर्वी मे 2021 मध्ये लग्न झालेल्या पूनम पाल हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करण्यात आली असल्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, आरोपी पतीकडून पत्नीच्या मृतदेहाचे कापलेले शीर मिळवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न रायगड पोलीस करत आहे.

Raigad Crime: माथेरानमध्ये हत्या झालेल्या महिलेची ओळख पटली, चारित्र्याच्या संशयावरुन पतीनेच काढला पत्नीचा काटा
माथेरानमध्ये हत्या झालेल्या महिलेची ओळख पटली
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Dec 13, 2021 | 10:25 PM
Share

माथेरान : माथेरानमध्ये एका लॉजमध्ये काल झालेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यास रायगड पोलिसांना यश आले आहे. महिलेच्या पतीनेच चारित्र्याच्या संशयावरुन तिची हत्या करुन शीर कापल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पूनम पाल असे या मयत महिलेचे नाव असून ती मुंबईतील गोरेगाव परिसरात राहते. रविवारी सकाळी लॉजच्या केअरटेकरने महिलेचा मृतदेह पाहिला होता. त्यानंतर माथेरानमध्ये खळबळ माजली होती.

मृतादेहाजवळ कोणतीही वस्तू किंवा ओळखपत्र नव्हते. तसेच महिलेची ओळख पटू नये म्हणून मारेकऱ्याने शीर कापून आपल्यासोबत नेले होते. यामुळे सदर महिलेची ओळख पटवणे आणि गुन्हेगाराला पकडणे हे रायगड पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र घटनास्थळापासून काही अंतरावर एका झुडुपात महिलेची बॅग पोलिसांना सापडली. त्यात एका चिट्ठीवर पत्ता लिहिला होता. त्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरु केलं.

महिलेच्या पतीला पनवेलमधून अटक

माथेरान येथील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने महिला आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाचा फोटोही मिळवण्यात पोलिसांना काल यश आले होते. यावरून, पोलिसांनी मुंबईतील गोरेगाव येथील पोलीस ठाण्यामध्ये चौकशी केली असता पूनम पाल ही महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचं निष्पन्न झालं. पुढील तपास केला असता पूनम पाल ही तरुणी नवऱ्याला भेटण्यासाठी गेली असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने तपास केला असता माथेरान येथे हत्या करण्यात आलेल्या तरुणीसोबत असलेला तरुण हा तिचा नवरा असल्याचं निष्पन्न झालं होतं. यावरून, पूनम पाल हिच्या नवऱ्याचा शोध घेतला असता त्याला पनवेल येथून ताब्यात घेण्यात आलं आहे.

सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

गेल्या सात महिन्यांपूर्वी मे 2021 मध्ये लग्न झालेल्या पूनम पाल हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करण्यात आली असल्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, आरोपी पतीकडून पत्नीच्या मृतदेहाचे कापलेले शीर मिळवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न रायगड पोलीस करत आहे. तर माथेरान येथे हत्या करण्यात आलेल्या पूनम पाल हिच्या हत्येच्या तपासासाठी रायगड पोलिसांची पाच पथकं तयार करण्यात आली होती.

कुटुंबीयांनी प्लान करुन पूनमला मारल्याचे भावाचा आरोप

मृत महिलेचा भाऊ रमेश पाल याने सांगितले की, पूनम पाल हिच्या पतीच्या घरच्यांनी लग्नात साडे पाच लाख रुपये हुंडा घेतला होता. तरीही लग्नानंतर आणखी पैशाची मागणी सासरकडून चालली होती. तसेच महिलेचे सासू-सासरे, नणंद, नणंदेचा नवरा यांनी माथेरानमध्ये जाऊन पूर्वतयारी केली. त्यानंतर प्लाननुसार पूनमची हत्या केल्याचे तिच्या भावाचे म्हणणे आहे.

खोटे नाव व पत्ता सांगून राहत होते लॉजवर

शनिवारी 11 डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास एक तरुणी आणि तरुण हे माथेरान येथे फिरायला आले होते. त्यावेळेस, त्यांनी इंदिरानगर येथील एका घरातील खोलीमध्ये वास्तव्य करीत रुबिना बेन आणि अमजद खान असं खोटं नाव सांगून अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचं नमूद केलं होतं. दरम्यान, रविवारी सकाळी त्यांच्या खोलीचे दार उघडं असल्याने साफ सफाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला खोलीतील दिवाणाखाली महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती त्याने पोलिसांना देताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. (The woman who was killed in Matheran was identified, the husband killed his wife)

इतर बातम्या

Kalyan Crime : दुसऱ्याच्या भांडणात लहान भावाची मध्यस्थी मोठ्या भावाच्या जिवावर बेतली, तरुण गंभीर जखमी

Jharkhand Crime: जन्मदात्याकडून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर तीन महिने बलात्कार; बाप-लेकीच्या नात्याला कलंक

Follow Us
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान