Jharkhand Crime: जन्मदात्याकडून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर तीन महिने बलात्कार; बाप-लेकीच्या नात्याला कलंक

Jharkhand Crime: जन्मदात्याकडून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर तीन महिने बलात्कार; बाप-लेकीच्या नात्याला कलंक
प्रातिनिधीक फोटो

रविवारी रात्री अल्पवयीन मुलीच्या आईने पतीचे हे घाणेरडे कृत्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याचे सांगितले जात आहे. ही घटना उघडकीस येताच बलात्कार करणाऱ्याने आई आणि मुलीला गोळ्या घालण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. मात्र अल्पवयीन मुलीच्या आईने न घाबरता रात्रीच झरिया पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Dec 13, 2021 | 6:54 PM

झारखंड : बाप-लेकीच्या नात्याला कलंक लावणारी लाजिरवाणी घटना झारखंडमध्ये घडली आहे. जन्मदाता बापच आपल्या अल्पवयीन मुलीवर सतत लैंगिक अत्याचार करत असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन झरिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बलात्कारी पित्याला अटक केली आहे.

मुलीच्या आईने पतीला रंगेहाथ पकडले

रविवारी रात्री अल्पवयीन मुलीच्या आईने पतीचे हे घाणेरडे कृत्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याचे सांगितले जात आहे. ही घटना उघडकीस येताच बलात्कार करणाऱ्याने आई आणि मुलीला गोळ्या घालण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. मात्र अल्पवयीन मुलीच्या आईने न घाबरता रात्रीच झरिया पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

झरिया पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

झरिया पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले की, एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार केली होती. ज्यामध्ये महिलेने पती आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर आरोप केले आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार मिळताच एफआयआर नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली. ते म्हणाले की, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपींवर पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.

घरातील इतरांना नशेचे पदार्थ देऊन झोपवायचा

मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले की, पती, एक मुलगा आणि मुलगी एकाच खोलीत राहतात. नवरा रोज दुधात अमली पदार्थ मिसळून प्यायला देत असे. आम्ही दूध पिऊन झोपून जायचो. आम्ही फक्त सकाळीच उठायचो, शनिवारी रात्री दूध थोडे कडवट लागले. म्हणून त्या दिवशी दूध न पिताच आम्ही झोपलो. रात्री नवऱ्याने घरातील सर्व दिवे बंद केल्याचे पाहिले. त्यानंतर तो मुलीच्या शेजारी झोपला. यानंतर त्याने मुलीसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. आम्ही उठून लाईट लावली. यानंतर मुलीने रडत रडत सर्व माहिती दिली. पतीचा विरोध केला असता त्याने आम्हाला मारहाण केली. आम्हाला घरातून हाकलून देण्यात आले, पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले. आरोपी पती टेम्पो चालक आहे. (Father rapes his minor daughter for three months in jharkhand)

इतर बातम्या

प्रेयसी बोलत नाही, हातावर ब्लेडचे वार करून प्रियकराची आत्महत्या, औरंगाबादेत प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Nagpur fraud | ओटीपी क्रमांक सांगणं महागात पडलं, कशी झाली पावणेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें