प्रेयसी बोलत नाही, हातावर ब्लेडचे वार करून प्रियकराची आत्महत्या, औरंगाबादेत प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रेयसी बोलत नाही, हातावर ब्लेडचे वार करून प्रियकराची आत्महत्या, औरंगाबादेत प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रातिनिधिक छायाचित्र/आत्महत्या

औरंगाबादमधील फुलेनगर, उस्मानपुरा येथील आकाश अविवाहित असून तो पेंटर काम करतो. आकाशचे कबीनगर येथील एका 38 वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध होते. मात्र अनेक दिवसांपासून ती बोलत नसलस्याने तरुणाने आत्महत्या केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Dec 13, 2021 | 5:19 PM

औरंगाबादः आपण जिच्यावर प्रेम करतो, ती प्रेयसी अनेक दिवसांपासून बोलायला टाळाटाळ करतेय, ही भावना सहन न झाल्याने एका प्रियकराने आत्महत्या केली. गुरुवारी रात्री प्रेयसीसोबत फोन सुरु असतानाच त्याने ब्लेडने हातावर सपासप वार करून गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आकाश मिसाळ (22) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

16 वर्षांनी मोठी प्रेयसी

औरंगाबादमधील फुलेनगर, उस्मानपुरा येथील आकाश अविवाहित असून तो पेंटर काम करतो. आकाशचे कबीनगर येथील एका 38 वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध होते. तिला सहा मुलं असून ती महिला भंगार गोळा करण्याचे काम करते. गुरुवारी आकाशने दारूच्या नशेतच प्रेयसीशी फोनवर बोलत असताना हातावर ब्लेडने वार करून घेतले. तसेच रात्री घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब शुक्रवारी सकाळी 6 च्या दरम्यान निदर्शनास आली. नातेवाईकांनी पोलिसांच्या मदतीने आकाशला घाटीत नेले, तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

महिलेने अनेकांना जाळ्यात ओढल्याचा आरोप

दरम्यान, सदर महिलेने यापूर्वीही अनेक लोकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आकाशच्या नातेवाईकांनी केला आहे. तिने अनेकांना फसवले, पण आमच्या मुलाचा जीव गेला. या प्रकारे आणखी कुणाचा जीव जाऊ नये, यासाठी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आकाशच्या आईने केली आहे. आकाश पंधरा वर्षांचा असताना चुलत भावाच्या प्रेयसीला पैसे आणून देणे व वस्तू नेऊन देण्याचे काम करत होता. या दरम्यान सदर महिलेची आणि आकाशची जवळीक वाढली. यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळल्याची माहिती अन्य एका नातेवाईकांनी पोलिसांना दिली.

इतर बातम्या-

MIM खासदार इम्तियाज जलील यांची सरकारला ऑफर, मुस्लिम आरक्षण दिलं तर महापालिका निवडणुका लढणार नाही!

Pune Crime | फ्रेशर्स पार्टीत राडा, दोघा ज्युनिअर्सना मारहाण, पुण्यात इंजिनिअरिंगच्या 12 विद्यार्थ्यांवर गुन्हा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें