आज पक्षी घिरट्या घालत आहेत, उद्या घिरट्या घालायची वेळ तुमच्यावर येणार आहे, कर्जत येथे राज ठाकरे यांनी व्यक्त केली भिती…
कर्जत येथे प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडी संदर्भात मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सभा घेतली. महाराष्ट्रात डेटा सेंटरसाठी ही वीज आणि पाणी प्रकल्प तयार केले जात आहेत. मी येथे आलो तर ही झाडांची कत्तल पाहून मला मी अंत्ययात्रेला आलो आहे की काय असे वाटल्याचे राज ठाकरे म्हणाले. येथील झाडे तोडल्यानंतर येथील पक्षी आकाशात घिरट्या घालत होती.त्यांची घरटी कोणी पाडली असा विचार ते करते होते. उद्या घिरट्या घालण्याची वेळ तुमच्यावर येणार आहे अशीही भिती राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

कर्जत येथे प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडी संदर्भात मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सभा घेतली. महाराष्ट्रात डेटा सेंटरसाठी ही वीज आणि पाणी प्रकल्प तयार केले जात आहेत. मी येथे आलो तर ही झाडांची कत्तल पाहून मला मी अंत्ययात्रेला आलो आहे की काय असे वाटल्याचे राज ठाकरे म्हणाले. येथील झाडे तोडल्यानंतर येथील पक्षी आकाशात घिरट्या घालत होती. त्यांची घरटी कोणी पाडली असा विचार ते करते होते. उद्या घिरट्या घालण्याची वेळ तुमच्यावर येणार आहे अशीही भिती राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
कर्जत येथील वीज प्रकल्पासाठी सगळी झाडे तोडली गेली आहे. या वृक्षतोडीच्या ठिकाणी मनसेचे नेते राज ठाकरे यांनी भेट दिल्यानंतर भाषण केले. यावेळी त्यांनी या प्रकल्पाची काय गरज आहे ? जरा मला सांगा. केंद्रात दोघे बसले आहे. ते राज्यातील सत्ताधाऱ्यांना आदेश देत आहे, आम्ही सांगतो त्यांना हा जमिनीचा तुकडा देऊन टाका आणि ते देऊन टाकतात. हा महाराष्ट्राच्या जर यांच्या हातात गेला तर हे वाटेल ते करतील महाराष्ट्राचे. आणि यांच्यात ही हिंमत येथे कुठून, ही हिंमत येते तुमच्यातूनच. कारण आज तुम्ही रडत बसताय, राजकीय पक्षाकडे जाणार, पण निवडणूकीच्या तोंडावरती जातीच्या, धर्मांच्या आणि पैशाच्या जोरावर तुमची मते विकत घेतल्याने त्यांना ही हिंमत आल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
विकत घेऊन अशा प्रकारे ३० ते ३५ टक्के मतदान होते आणि बाकी निवडणूक आयोग आहेच. १५०० रुपये किती काळ पुरणार आहेत तुम्हाला? या दीड हजारात तुम्हाला विकत घेतले जातंय. येथे बसलेल्याच्या हातात काय नाही. केंद्राने ठरवलं आणि खाजगी कंपनीने ठरवले की प्रकल्प येत आहेत.ही जंगल कोणाला द्यायचे हे वरचे दोघे ठरवत आहेत. आम्हाला ही माणसे हटवून द्या, झाडे हटवून द्या असे आदेश दिले जात असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
हा गप्प राहणारा, मान घालून जगणारा महाराष्ट्र आपण पाहणार. गुजरातमधील दोन माणसे आमचा महाराष्ट्र चालवणार, आम्हाला काही. दोन महिला मला भेटल्या. आमचे जंगल वाचवा. तुमचे कोयते काय करतात ? हे कोयते काय फक्त फांद्या छाटाय साठी आहेत काय असाही सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.