AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गजानन किर्तीकरांच्या पत्रामुळे एकनाथ शिंदेंना टेन्शन, लेटर बॉम्बद्वारे महत्त्वाची मागणी

महाराष्ट्र विधानसभेतून रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटात हालचाली वाढल्या आहेत. ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी या जागेसाठी प्रबळ दावेदारी केली असून ते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

गजानन किर्तीकरांच्या पत्रामुळे एकनाथ शिंदेंना टेन्शन, लेटर बॉम्बद्वारे महत्त्वाची मागणी
gajanan kirtikar eknath shinde
| Updated on: Feb 22, 2026 | 9:51 AM
Share

महाराष्ट्र विधानसभेतून रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेसाठी आता सत्ताधारी शिवसेना शिंदे गटामध्ये हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडण्यात येणाऱ्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटामध्ये आता ज्येष्ठ विरुद्ध तरुण असा संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ आणि अत्यंत निष्ठावंत नेते माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी या जागेसाठी आपली प्रबळ दावेदारी सादर केली आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

पक्षातील प्रदीर्घ राजकीय अनुभव, वैधानिक कामाचा दांडगा व्यासंग आणि संघटनेवरील पकड लक्षात घेता, राज्यसभेत पक्षाची बाजू मांडण्यासाठी आपली निवड व्हावी, अशी आग्रही विनंती गजानन किर्तीकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी गजानन किर्तीकर येत्या दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. तसेच याबद्दलचे एक पत्र गजानन किर्तीकर यांनी देत आपली इच्छा व्यक्त केली आहे.

गजानन कीर्तिकर शिवसेनेचे अत्यंत जुने आणि जाणते नेते

गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे अत्यंत जुने आणि जाणते नेते मानले जातात. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. केवळ संसदीय राजकारणच नव्हे, तर संघटनात्मक पातळीवरही त्यांचा मोठा दबदबा आहे. सध्या ते स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष आणि गोवा राज्य संपर्कनेते म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या या वैधानिक आणि प्रशासकीय अनुभवाचा फायदा राज्यसभेत पक्षाची बाजू मांडण्यासाठी व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत गजानन कीर्तिकर यांची पक्षनिष्ठा संपूर्ण राज्याने पाहिली. त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर हे शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार असतानाही, गजानन कीर्तिकर यांनी पुत्रापेक्षा पक्षाला प्राधान्य दिले. त्यांनी शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करून आपली निष्ठा सिद्ध केली होती. मुलाशी कौटुंबिक नाते असले तरी, राजकीय भूमिका ही पक्षासोबतच राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते.

शिंदे गट दिल्लीत आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत

दरम्यान राज्यसभेच्या एका जागेसाठी शिंदे गटात सध्या अंतर्गत स्पर्धा वाढली आहे. गजानन कीर्तिकर यांच्यासोबतच माजी खासदार राहुल शेवाळे आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले संजय निरुपम यांची नावेही चर्चेत आहेत. राहुल शेवाळे यांचा दिल्लीतील कामाचा अनुभव आणि संजय निरुपम यांची हिंदी भाषेतून मुद्दे मांडण्याची शैली या बाबीही विचारात घेतल्या जात आहेत. मात्र, कीर्तिकर हे पक्षाचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत चेहरा असल्याने त्यांना प्राधान्य मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कीर्तिकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपली इच्छा आधीच कळवली आहे. आता प्रत्यक्ष भेटीत ते आपल्या कार्याचा लेखाजोखा मांडणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणात, अनुभवी नेत्याला राज्यसभेत पाठवून शिंदे गट दिल्लीत आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहे.

Follow Us
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक