‘माझा संतोष देशमुख करायचा होता’ अधिकाऱ्यांच्या पार्टीचं ड्रोन शूट करणाऱ्या रमाकांत गावडेंवर प्राणघातक हल्ला

Mutton Party in Amravati: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावरच्या मटण पार्टीचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला. हा व्हिडीओ शूट करणाऱ्यावर आता प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

माझा संतोष देशमुख करायचा होता अधिकाऱ्यांच्या पार्टीचं ड्रोन शूट करणाऱ्या रमाकांत गावडेंवर प्राणघातक हल्ला
morshi mutton party drone video
| Updated on: Nov 18, 2026 | 11:52 AM

अलीकडेच, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावरची मटण पार्टी चांगलीच चर्चेत आलेली. ती पार्टी अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला. ही घटना एका ड्रोन व्हिडीओमुळे समोर आलेला. हा ड्रोन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेला. याशिवाय या प्रकारामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली होती कारण राज्यात दुष्काळ असताना अशा प्रकारे सरकारी अधिकाऱ्यांनी वागणे शोभून दिसत नाही. यावरून चांगलंच राजकारणही तापलेलं. ड्रोनद्वारे चित्रण करणारे रमाकांत गावंडे होते. आता रमाकांत गावंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे समोर आले आहे.

या हल्ल्यानंतर “माझा संतोष देशमुख करायचा होता” असं म्हणत रमाकांत गावंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. सध्या त्यांच्यावर अमरावतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावर सामाजिक कार्यकर्ते निलेश रोडे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, मोर्शीचा बिहार झाला. याशिवाय हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या मोर्शी शहर बंदच आवाहनही सामाजिक कार्यकर्ते निलेश रोडे यांनी केले आहे.

Loading...

नेमकी घटना काय?

अमरावतीमधील मोर्शी येथे शासकीय कार्यालय बंद असताना रात्रीच्या सुमारास मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या कथित ‘ओली पार्टी’ रंगल्याचा प्रकार उघडकीस आला. ही पार्टी सुरु असताना एक ड्रोन व्हिडीओने याच शूट केले गेले. हा व्हिडीओ समोर आल्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप आमदार उमेश यावलकर यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं आहे. या निवेदनातून अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अशाप्रकारच्या पार्टीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. मात्र भाजपच्या या आरोपांनंतर शिंदे शिवसेनेनेही पलटवार केला आहे. याआधी भाजपच्या महिला व बालकल्याण सभापतींनीदेखील नगरपरिषदेत तब्बल 200 ते 250 लोकांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. याशिवाय आम्हाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोपही केला गेला आहे.

दुष्काळाचे तीव्र सावट आणि शेतकऱ्यांचे हाल

सध्या पावसाच्या लहरीपणामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळाचे तीव्र सावट आहे. या दुष्काळाने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. अशात अशा प्रकारची पार्टी तेही शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी होणे हे योग्य नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us