AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर मातोश्रीलाही कापरे भरेल, उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट कराच; रामदास कदम यांचं थेट आव्हान

दसरा मेळाव्यात बोलताना रामदास कदम यांनी बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीमध्ये होता असं वक्तव्य केलं होतं, यावरून वातावरण तापलेलं असतानाच आता त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.

...तर मातोश्रीलाही कापरे भरेल, उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट कराच; रामदास कदम यांचं थेट आव्हान
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2025 | 7:24 PM
Share

गुरुवारी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला, या मेळाव्यात बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मोठा दावा केला आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह मातोश्रीवर दोन दिवस होता, त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असं खळबळजनक विधान कदम यांनी केलं आहे. या वक्तव्यावरून राजकारण तापलं असतानाच आता पुन्हा एकदा कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले कदम? 

मी आज उद्धव ठाकरेंना आव्हान देत आहे,  हिंमत असेल तर तुम्ही बोला, तुम्हाला मी उत्तर देईल. अंबादास दानवे सारख्यांना मी निवडून आणलं, बाळासाहेब ठाकरेंचं मी रोज दर्शन घेतो.  उद्धव ठाकरेंनी हिंमत असेल तर समोर यावं, आणि असं घडलं नाही सांगावं. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची ठाकरे यांची सवयच आहे. दोन दिवस बाळासाहेबांच्या मृतदेहाचा छळ उद्धव ठाकरेंनी केला. माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा.  मी बोललो होतो, बाळासाहेबांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमचे दैवत आहेत, तेव्हा ठाकरे म्हणाले मी हाताचे ठसे घेऊन ठेवलेत असा हल्लाबोल यावेळी कदम यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेबांचं निधन झालं हे मी लोकांसमोर डिक्लेअर केलं, मी मर्द माणूस आहे, घाबरणारा नाही. काल मी ओघाओघामध्ये बोलून गेलो. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने स्टेटमेंट देतात, तसे ते नाहीयेत. उद्धव ठाकरे वाघ नाहीत तर लांडगा आहेत.  अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या,  ज्या ज्यावेळी तोंड उघडणार,  त्या- त्यावेळी मातोश्रीवर हादरा बसेल.  माझ्य़ा नादीला लागू नका, असा इशाराही यावेळी कदम यांनी दिला आहे.

मी निष्ठेनं शिवसेनेसोबत दिवस काढले आहेत, बाळासाहेबांसोबत असं घडलं याचं मला वाईट वाटतं. त्यावेळी जे डॉक्टर होते त्यांना विचारा, निधन कधी झालं.  मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, बदलणार नाही. बाळासाहेब तुमच्या बाबतीत माझ्याकडे काय बोलले हे माझ्या मनात आहे. मला बोलायला लावू नका, बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही? असा प्रश्नही यावेळी कदम यांनी उपस्थित केला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...