AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातो, तुझी औकात काय… मनोज जरांगेंवर रामदास कदमांची थेट जहरी टीका..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री आण उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख ऐकरी भाषेतही त्यांच्याकडून केला जात आहे. त्यातच आता शिवसेनेच्या बड्या नेत्याने मोठे आरोप जरांगेंवर केले.

बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातो, तुझी औकात काय...  मनोज जरांगेंवर रामदास कदमांची थेट जहरी टीका..
Manoj Jarange Patil and Ramdas Kadam
| Updated on: Oct 21, 2026 | 12:41 PM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी लढा देत आहेत. मात्र, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका जरांगे करत असल्याने शिवसेना शिंदे गटाचे नेते जरांगेंवर टीका करत आहेत. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मोठी टीका जरांगेंवर केली. फक्त टीकाच नाही तर थेट गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, बाथरूममघ्ये जाऊन गुपचूप खातोस… सगळ्यांना फसवतो. आता माझी शिंदे साहेबांना विनंती आहे की, त्यांनी याची चाैकशीच लावली पाहिजे. तू कोणाची बदनामी करत आहेस आणि तू कोणाकडून सुपारी घेतली असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. मराठा समाजाने तुला न्याय देण्यासाठी पाठिंबा दिला आहे. पण तू त्याचा गैरफायदा घेत आहेत.

अरे ज्या गावात तू उपोषणाला बसला, त्या गाववाल्यांनी तुला हाकलून दिले. मी एक गोष्ट सांगतो जर तू एकनाथ शिंदे यांना संपवायला जात असशील तर तू स्वत: संपशील हेच लक्षात ठेव. तू कोण आहे? हा मराठ्यांचा नेता झाल्यापासून याची संपत्ती कुठे आहे. कोणा कोणाच्या नावावर आहे, कोणत्या नातेवाईकाच्या नावावर आहे, याची चाैकशी लावा.

दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाऊद्या. 500 कोटींचा आरोप करतोय… बाप दाखव आणि श्राद्ध घाल, असेही रामदास कदम यांनी म्हटले. अरे तू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेत उल्लेख करतो. जगाचा मालक आहेस का? जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांवर उत्तर देताना रामदास कदम दिसले.

आता जरांगे या टीकेवर काय उत्तर देतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. यासोबतच मराठा आंदोलनातील सक्रिय कार्यकर्तेही जरांगेंच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. जरांगेंच्या उपोषणाच्या पहिल्या लढ्यापासूनसोबत असलेल्या महिला कार्यकर्त्यांनीही त्यांच्यावर आरोप केले. थेट हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचले.

Follow Us
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा