नांदेडमध्ये नागरिकांचा रास्ता रोको, हिमायतनगर ते किनवट महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी

स्त्याच्या कामासाठी होणारी लोकांची हेळसांड थांबली पाहिजे. येत्या 15 ते 20 दिवसांत रस्त्याच्या कामाने वेग घेतला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करणार असा इशारा माधवराव पाटील यांनी दिला आहे.

नांदेडमध्ये नागरिकांचा रास्ता रोको, हिमायतनगर ते किनवट महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 2:33 PM

नांदेडः शहरातील महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात हिमायतनगरमध्ये नागरिकांनी (Nanded Agitation) मोठं आंदोलन छेडलं. हिमायतनगर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे हिमायत नगर (Himayat Nagar) शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून येथून प्रवास करणाऱ्यांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. चांगल्या रस्त्याच्या अभावी प्रवाशांचे हाल होत आहेत. याविरोधात आज नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र आल्यामुळे वाहतूक ठप्प (Traffic jam) झाली होती.

अनेक वर्षांपासून काम रखडले, नागरिक त्रस्त

हिमायतनगर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने हिमायतनगर शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलय तसेच या रस्त्याअभावी प्रवाश्यांचे हाल होत आहेत. हायवेचे रखडलेले हे काम तातडीने पूर्ण करावे यासाठी स्थानिकांनी प्रशासनाला वेळोवेळी विनंत्या केल्या, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने नागरिक आज रस्त्यावर उतरले आहेत. या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व स्थानिक आमदार आमदार माधवराव पाटील जवळगांवकर हे करत आहेत.

काय म्हणाले आमदार?

या आंदोलनाचं नेतृत्व माधवराव पाटील जळगावकर करत आहेत. त्यांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटले की, रस्त्याचे काम वेगाने पूर्ण झाले पाहिजे. येत्या पावसाळ्याच्या आत तत्काळ वेगाने पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा आहे. लोकांच्या सेवेसाठी हे काम पूर्ण करावे. रस्त्याच्या कामासाठी होणारी लोकांची हेळसांड थांबली पाहिजे. येत्या 15 ते 20 दिवसांत रस्त्याच्या कामाने वेग घेतला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करणार असा इशारा माधवराव पाटील यांनी दिला आहे.

इतर बातम्या-

Manipur Election : मणिपूरमध्ये 22 जागांसाठी मतदान सुरू, दुसऱ्या टप्प्यासाठी 1247 मतदान केंद्र सज्ज

ओबीसी आरक्षणावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक! अध्यक्ष तायवाडे यांनी सांगितलं पुढील पाऊल काय असणार