आता नांदेडमध्येही पाइपद्वारे गॅस मिळणार, 1200 कोटी रुपये मंजूर, खासदार प्रताप चिखलीकरांचा यांची माहिती

नांदेड जिल्ह्यातील आठ लाख घरांना नैसर्गिक गॅस पाईपलाईनने जोडण्यासाठी केंद्र सरकारने 1200 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता दिलीय. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलीय.

आता नांदेडमध्येही पाइपद्वारे गॅस मिळणार, 1200 कोटी रुपये मंजूर, खासदार प्रताप चिखलीकरांचा यांची माहिती
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 5:39 PM

नांदेडः औरंगाबादपाठोपाठ (Aurangabad) आता नांदेडकरांनाही पाइपलाइनने घरगुती गॅस (Natural Gas) मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील आठ लाख घरांना नैसर्गिक गॅस पाईपलाईनने जोडण्यासाठी केंद्र सरकारने 1200 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता दिलीय. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (MP Pratap Chikhalikar) यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलीय. अर्थात हा प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र पाइपलाइनद्वारे मिळणारा गॅस नागरिकांना सध्याच्या सिलिंडरमधून पुरवल्या जाणाऱ्या गॅसपेक्षा अधिक स्वस्त आणि सुरक्षित अशा स्वरुपात मिळेल, असे आश्वासन खासदारांनी दिले.

बुलडाणा ते नांदेड 270 किमीची पाइपलाइन

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, गॅस पाइपलाइनची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे- – नांदेडमध्ये पाइप लाइनने गॅस आणण्यासाठी बुलढाणा ते नांदेड अशी 270 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. – त्याचबरोबर याच माध्यमातून नांदेड जिल्ह्यात 170 सीएनजी पंप उभारण्यात येणार असल्याचे खासदारांनी सांगितलं. नांदेडचा गॅस पाईपलाईन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीला मान्यता मिळाली असून या प्रकल्पाला आठ वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे खासदारांनी सांगितलं. – घरगुती गॅस पाईपलाईनसाठी औरंगाबाद नंतर  नांदेडला प्राधान्य मिळत असल्याचे दिसतंय. – सिलिंडरपेक्षाही पाइपलाइनच्या माध्यमातून मिळणारा गॅस स्वस्त असेल, अशी माहिती खासदारांनी दिली. – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीला लायसन्स प्रदान केले आहे. त्यामुळे येत्या काळात नांदेड लोकसभा मतदारसंघ नॅचरल गॅस पाइपलाइनने जोडले जाणार असल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले.

औरंगाबाद गॅस पाइपलाइनच्या कामाचा नुकताच शुभारंभ

औरंगाबादेत पाइप लाइनच्या माध्यमातून घरगुती आणि व्यावसायिक गॅस उपलब्ध करून देणाऱ्या योजनेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. याद्वारे शहरातील घरांमध्ये लवकरच पाइपद्वारे स्वच्च आणि हलक्या स्वरुपाचा नैसर्गिक गॅस इंधनासाठी पुरवला जाईल. औरंगाबादेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या पुढाकारातून या योजनेचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात करण्यात आला.

इतर बातम्या-

Video – Nagpur Crime | दुचाकीस्वार आले, वृद्ध महिलेच्या हातून पैशांची पिशवी घेऊन पळाले! सीसीटीव्हीत घटना कैद

स्टारलिंक सॅटेलाईट सिस्टमचा सावधानतेने वापर करा;स्पेसएक्सचा सीईओ एलन मास्कचे आवाहन; रशिया करु शकते गैरवापर

Non Stop LIVE Update
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.