या सगळ्यांचा एकच शत्रू उद्धव ठाकरे, 50 खोके, गद्दार बोके म्हणत या नेत्याने निशाणा साधला

भाजपा गद्दार पार्टी आणि मनसे आता सर्व एकवटताहेत. ते फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी. त्यांचा सर्वांचा एकत्र शत्रू उद्धव ठाकरे आहेत.

या सगळ्यांचा एकच शत्रू उद्धव ठाकरे, 50 खोके, गद्दार बोके म्हणत या नेत्याने निशाणा साधला
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 7:07 PM

रत्नागिरीः उद्धव ठाकरे गटाची जिल्हा कार्यकारणी बैठक खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत पुढील निवडणुकीत 100 टक्के यश संपादन करण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली.यावेळी भास्कर जाधव यांचेही विनायक राऊत यांच्याकडून कौतूक करण्यात आले. मिंदे गटाचे सर्व वार हे हे ढालीसारखे झेलत आपण पुढं जात आहोत असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

सभासद नोंदणी विषयी सांगताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे गटाचे 52 हजार सभासद नोंदणी करत रत्नागिरी सिंधुदूर्ग टक्केवारीत प्रथम आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

जिल्हा परिषदेला 2 हजार 500 सभासद नोंदणी जो कोणी करणार त्याला त्याला जिल्हा परिषदेचे तिकिट देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत सभासद नोंदणी हा पात्रतेचा निकष असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले की,50 खोके गद्दार बोके असतील त्या सर्वांना काढून टाकलं आहे असा जोरदार त्यांच्यावर घणाघातही करण्यात आला आहे.

बेईमानाची पर्वा करू नका, पैसे कितीही टाकले तरी आता निवडणूक येवू शकणार नाहीत असा टोला उदय सामंत यांना लगावला.

यावेळी बोलताना त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये ज्याप्रमाणे मंत्री महोदयांना क्लिन बोल्ड केलं आहे तोच प्लॅन पुढच्या निवडणुकीतही वापरायचा आहे असंही त्यांनी कार्यकर्त्यांनी आवाहन केले.

शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले की, कुणालाही लाज शरम राहिली नाही, त्यामुळे केवळ आणि केवळ खोक्यांसाठी उद्धव ठाकरे यांच्याशी बेईमानी केली असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

ऋतुजा लटके यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांचेही अभिनंदन केले. त्यावेळी ते म्हणाले की, आपला नारळ खणखणीत आहे. लोकांसाठी काम केलं म्हणूनच अंधेरी पोटनिवडणुकीत आपला विजय झाला आहे.

प्रत्येक गोष्टीत उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे. तरीही जी लोकं जोरदार टीका करतात त्यांना त्यांनी सांगितले की, तुमच्या बारश्याच्या घुगऱ्या खाल्ल्या आहेत. असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

महाराष्ट्र कर्जबाजारी झाला असला तरीही शिंदे गट सगळे प्रकल्प गुजरात जाण्यासाठीच प्रयत्न करु लागले आहेत. उद्योग करायचे ते करा पण असे उद्योग का करतात, पांढऱ्या पायाच्या सरकारने उद्योग महाराष्ट्राबाहेर घालवले असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

देशातल्या सर्वात मोठ्या उद्योग पतीचे घर भरण्यासाठीच यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच त्यांनी आनंद शिधाचे पैसे घेतले गेले असा टोलाही त्यांनी त्यांच्यावर लगावला आहे.

भाजपा गद्दार पार्टी आणि मनसे आता सर्व एकवटताहेत. ते फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी. त्यांचा सर्वांचा एकत्र शत्रू उद्धव ठाकरे आहेत. मुंबई गुजराथला देवून टाकण्यासाठीच गद्दारांचा वापर केला जातो आहे असा जोरदार निशाणाही त्यांनी शिंदे सरकारवर साधला आहे.

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.