रविराज साबळे पाटील निवडणूकीच्या मैदानात, पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे राहणार
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेल्या रविराज साबळे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

युवा शेतकरी नेते रविराज साबळे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत आपण राजकारणात उतरत असल्याचे म्हटले आहे. राजकारणात उतरुनच परिस्थितीत बदल घडवावा लागतो असे म्हणत रविराज साबळे पाटील यांनी आपण पदवीधरांच्या हक्कांसाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले आणि लाखो युवा शेतकरी असलेले रविराज साबळे पाटील यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांनी अनेक तरुणांना आधुनिक शेती करण्याचे धडे दिलेले आहेत. तसेच अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला आहे. रविराज साबळे पाटील हे महाराष्ट्रातील धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक प्रसिद्ध तरुण कृषी उद्योजक आहेत. शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवता येते आणि शेती हा तोट्याचा व्यवसाय नसून फायद्याचा ठरू शकतो हे त्यांनी तरुणांना दाखवून दिले आहे.
येथे पोस्ट वाचा –
View this post on Instagram
त्यांनी या संदर्भात समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट जशीच्या तशी..वाचा
होय लढतोय मी पदवीधर ची निवडणूक छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून अपक्ष, तुमच्या सर्वांच्या मागणीमुळे..!🦁🚩
कशाला राजकारणात येतो, आपलं काम आहे का, हाच प्रश्न असेल ना तर ऐका ह्याच विचारांमुळे वाटोळ झालंय सर्वसामान्यांचं, विद्यार्थी रस्त्यावर उतरला पण त्यांच्यासाठी पदवीधर आमदार कधीच आवाज उठवताना दिसला नाही, निवडणूक आली की बाहेर आले, मला काही रस नाही राजकारणात जर आज मी असं म्हणालो तर ही परस्थिती बदलणार नाही आपल्याला कुठे तरी समोर येऊन लढाव लागेल, मला माहित आहे ही लढाई मोठी आहे पण अश्यक्य नाहीये, लढू आणि जिंकूच तुम्ही प्रेम द्यायला आहेतच की, अन् पडलं तरी असं पण आपला बाप कुठे आमदार खासदार आहेत ते आपल्याला वाईट वाटेल, पडल्यावर दुःख त्यांना आपण थाटात, सगळ्यांच्या इच्छेनुसार लढायचा निर्णय घेतला आहे, पैसा नाहीये, यंत्रणा नाहीये, कार्यकर्ता नाहीये, पण जिगरा आहे बॉस लढायचा, तुमच्या सगळ्यांना प्रचार करावा लागेल, पदवीधरांच्या हक्कासाठी मी ही निवडणूक अपक्ष लढवत आहे…जिंकवणार ना? 🙏 जय भीम..जय शिवराय…जय मल्हार…जय लहुजी…जय भगवान…जय जोहर..!
