AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rent a Garba Partner च्या जाहिरातींवरून वाद; भाजप आमदाराकडून ॲपवर बंदीची मागणी

Rent a Garba Partner हा व्हायरल ट्रेंड आता सायबर क्राईमच्या कक्षेत आला आहे. नवरात्रीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भाजप आमदारांनी मीरा-भाईंदर आयुक्तांना पत्र लिहून या ॲपवर त्वरित बंदी घालण्याची आणि फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Rent a Garba Partner च्या जाहिरातींवरून वाद; भाजप आमदाराकडून ॲपवर बंदीची मागणी
| Updated on: Sep 23, 2026 | 6:23 PM
Share

वैभव घाग , प्रतिनिधी :  गणेशोत्सव संपत आला असून आता अवघ्या काही दिवसात घट बसतील आणि नवरात्र सुरू होईल. नवरात्र म्हणताच अनेकांच्या डोळ्यांसमोर येतो तो गरबा. मुंबईसह राज्यभरात आणि देशभरातही अनेक ठिकाणी गरबा नाईटचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र सध्या या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. नवरात्र सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरस झाली आहे. Rent A Garba Partner ची पोस्टर्स सध्या अनेक ठिकाणी दिसत असून हा फक्त आता मजेचा किंवा सोशल मीडिया ट्रेंडचा विषय राहिलेला नाही. मुंबईसह ही पोस्ट देशभरातील अनेक शहरात दिसून आली. सोशल मीडियावर हे अकाऊंट समोर आल्यावर हे प्रकरण आता सायबर क्राइमच्या तपासाअंतर्गत आलं आहे.

याचदरम्यान आता भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी या पोस्टविरोधात भूमिका घेतली आहे. सदर “Rent a Garba Partner” ॲप तात्काळ बंद करण्यात यावे, असं लेखी निवेदन त्यांनी मीरा-भाईंदर वसई विरार चे आयुक्त अनिकेत कौशिक यांना दिलं आहे. सोशल मीडियावर 1000 ते 6500 रुपयांपर्यंत गरबा पार्टनर देण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या जाहिरातींमार्फत महिला व तरुणींची फसवणूक व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. ॲपचे मालक, निर्माते आणि जाहिरातदारांवर कठोर गुन्हे दाखल करून तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वीच मुंबईतील भाजप नेते संजय उपाध्याय यांनीही मुंबई पोलिसांना पत्र लिहीलं होतं.  Rent a Garba Partner या जाहिरातींमागे कोण आहे, आणि त्यांचा नेमका उद्देश काय आहे, हे शोधावं अशी मागणी त्यांनी केली होती. तर आता आनदार नरेंद्र मेहाता यांनी देखील हे ॲप तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी त्यांच्या निवेदनातून केली आहे. तसेच या अ‍ॅपच्या फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी पोलिसांनी महिला व तरुणींमध्ये जनजागृती करावी , असंही त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.

काय आहे पोस्ट ?

Rent a Garba Partner – अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टर्समध्ये Silver, Gold आणि Platinum अशी पॅकेजेस तयार करण्यात आली आहेत. काही पोस्टमध्ये 1,000 ते 2,000 पर्यंतची पॅकेजेस आहेत, तर आणखी एका व्हायरल पोस्टमध्ये किंमती 3,000 पासून वाढून 6,500 पर्यंत असल्याचे सांगण्यात आलं आहे. यामध्ये दोन तासांपासून संपूर्ण रात्रभर गरबा पार्टनर, डान्स स्टेप्स शिकवणे, मॅचिंग आउटफिट, सेल्फी, Instagram रील्स आणि फोटो अशा सेवांचा दावा करण्यात आला आहे. काही पोस्टमध्ये तर कपाळावर किस (forehead kiss), रात्री उशिरा फूड आउटिंग आणि घरी सोडण्यात येईल, अशा गोष्टींचाही उल्लेख करण्यात आल्याचे समजते.

मात्र गरबा पार्टनर देण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या जाहिरातींमुळे महिला व तरुणींची फसवणूक व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे बोलले जात असून हे ॲप बंद करण्याची मागणी केली जात आहे. आज नरेंद्र मेहतानी याबद्दल निवेदन दिलं. तर आधी भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबई पोलिसांकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून अशा प्रकारच्या गतिविधींना प्रोत्साहन दिले जात असल्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी व्हायरल जाहिरातींची सत्यता, त्यामागे असलेल्या व्यक्ती तसेच आयोजकांची माहिती तपासण्याची मागणी केली.

Follow Us
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!