AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर दस्त नोंदणी होणार नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनुकळे यांचा सर्वात मोठा निर्णय

दस्त नोंदणीबाबत महत्वाची बातमी हाती आली आहे. याबाबतचा महत्वाचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.

...तर दस्त नोंदणी होणार नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनुकळे यांचा सर्वात मोठा निर्णय
chandrashekhar bawankuleImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 01, 2026 | 11:37 AM
Share

दस्त नोंदणीबाबत महत्त्वाची बातमी हाती आली आहे. आता आधारकार्ड नसेल तर कोणतीच दस्त नोंदणी होणार नाही. त्यामुळे आता दस्त नोंदणीसाठी ओळखपत्र अनिवार्य असणार आहे. दस्त नोंदणीबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मालमत्ता खरेदी विक्रीतील फसवणूक टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर निर्णय घेतल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. या निर्णयाने खोटे साक्षीदार, खोटो पक्षकार उभे करून होणारी फसवणूक टाळता येणार आहे. त्याचबरोबर खरेदी, विक्री, बक्षीस, गहाण, वाटणीसह 63 प्रकारच्या नोंदीसाठी आधार ओळखपत्र सक्तीचं करण्यात आलंय. महसूल विभागाचा हा निर्णय 1 ऑक्टोबर म्हणजे आजपासून निर्णय होणार आहे. यासाठी शासनाचं राजपत्र देखील जारी झालं आहे.

1970 पासून रखडला होता प्रकल्प 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुढे म्हटलं की, पालघरमध्ये सूर्य प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी घरे आणि जमिनी संपादन होत आहे. हे करत असताना हमुनान नगर इतर काही गावे आहेत. या गावांचं पुनर्वसन 1979 साली झालं. परंतु त्यांचा जमिनीचा रेकॉर्ड नव्हता. त्यामुळे पुनर्वसनात पैसे कोणाला द्यायचे , अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे 1970 ची दुरुस्ती केली. त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड तयार करून देणार. त्याचा सातबारा करून देणार. त्यानंतर त्या सातबारा, प्रॉपर्टी कार्ड झाल्यावर भूसंपादनाचा पैसा देणार. त्यांचे भूखंड मिळतील. 1970 पासून हा प्रकल्प होत नव्हता. परंतु काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सूर्या प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात आला’.

ज्यांना घरे नाही, त्यांना घरे मिळणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील गरजू लोकांना घरे हवी होती. परंतु जागा नव्हती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचना केली होती. त्यानंतर एका प्रकल्पाच्या बाजूला जागा होती. तिथे स्मार्ट व्हिलेजची संकल्पना केंद्रीयमंत्री गडकरी यांनी मांडली होती. त्यानंतर मंत्रिमंडळात निर्णय झाला. यासाठी निशुल्क जागा देण्यात आली. ज्यांच्याकडे घरे नाहीत. फासेपारधी लोक आहेत. ज्यांना घरे नाहीत. त्यांना घरे मिळणार आहेत’.

Follow Us
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....