VSR, राघव शर्मा अन् मफलरमॅन देवेंद्र फडणवीस..अजितदादा प्रकरणात रोहित पवारांचे 3 व्हिडिओ बॉम्ब; नव्या दाव्याने खळबळ!
आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रोहित पवार यांनी व्हिके सिंग याला महाराष्ट्रातील बडा नेता वाचवत आहे, असा गौप्यस्फोट केला. या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी तीन व्हिडिओ दाखवत अजित पवार यांच्या अपघातावरुन गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

Rohit Pawar PC On Ajit Pawar Plane Crash Accident: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावरुन गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रोहित पवार यांनी व्हिके सिंग याला महाराष्ट्रातील बडा नेता वाचवत आहे, असा गौप्यस्फोट केला. या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी तीन व्हिडिओ दाखवत अजित पवार यांच्या अपघातावरुन गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
काय म्हणाले रोहित पवार?
“अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाचा तपास का केला जात नाही? सीबीआयकडे तपास का दिला जात नाही. व्हिएसआरला कोणी वाचवायचा प्रयत्न करत आहे का? हे तुम्हाला पुढे जो मफलर मॅन कोण? याबाबत फोटो दाखवेल त्यावरुन लक्षात येईल. या लग्नासाठी महाराष्ट्रातून एक विमान गेले होते. फोटोतील व्यक्तीचे आणि अपघाताचे काही देणेघेणे नसावे, मात्र व्हिएसआरला वाचवणारा महाराष्ट्रातील एक मोठा नेता आहे,” असं म्हणत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोटो दाखवला.
“व्हि.के सिंगच्या जवळ आपल्या राज्यातले मुख्यमंत्री आहेत असं आमचे ठाम मत आहे,हा फोटो अनेक दिवसांपासून आमच्याकडे हता, मात्र आम्हाला राजकारण करायचं नव्हते. यांच्याकडे सत्ता आहे तरीही अजित पवारांच्या अपघाताचा तपास का होत नाही? कारण त्याच्याजवळ राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत,” असं रोहित पवार म्हणाले.
राघव शर्मा कोण? मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीलाही उपस्थित!
“राघव शर्मा हा रोहित सिंहचा जवळचा मित्र आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी निकाल लागणार होता त्यादिवशी या लग्नासाठी आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री फक्त दीड तासासाठी गेले होते. महाराष्ट्रात एवढं राजकीय वातावरण तापले असताना या लग्नाला ते गेले कारण संबंध जवळचे होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे संबंध असतील तर दादांना न्याय मिळेल का? अशा परिस्थितीत दादांना न्याय मिळेल का? असा आमचा सवाल आहे. तसेच हाच राघव शर्मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यालाही उपस्थित होता,” असं म्हणत रोहित पवार यांनी तो व्हिडिओही दाखवला.