AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारवाई झालीच पाहिजे, आता चाकणकर यांनी…राष्ट्रीय महिला आयोगाच्या भूमिकेने खळबळ; नेमकं काय होणार?

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रुपाली चाकणकर यांना आवाहन केले आहे. त्यामुळे आता चाकणकर काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कारवाई झालीच पाहिजे, आता चाकणकर यांनी...राष्ट्रीय महिला आयोगाच्या भूमिकेने खळबळ; नेमकं काय होणार?
ashok kharat and rupali chakankar and ashok kharatImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 20, 2026 | 2:55 PM
Share

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे. त्याने केलेले महिलांचे शोषण तसेच त्याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांची एक-एक प्रकरणं थक्क करणारी आहेत. तो सध्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. खरातचे प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्या जवळच्या वर्तुळात असणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांवर वेगवेगळे आरोप करण्यात आले. राष्ट्रवादी (सुनेत्रा पवार गट) पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना तर महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही गमवावे लागले. त्यांच्यावर अटकेची कारवाई करा, अशी मागणी केली जात आहे. पोलिसांनीही त्यांना समन्स बजावले होते. असे असतानाच आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रुपाली चाकणकर यांना एक सल्ला दिला आहे.

विजया रहाटकर नेमकं काय म्हणाल्या?

या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एसआयटी आपले काम करत आहे. महाराष्ट्र पोलीस अत्यंत निपक्ष:पातीपणे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतील, असा विश्वास विजया रहाटकर यांनी व्यक्त केला.

रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना सहकार्य करावे

तसेच, पोलीस ज्या-ज्या वेळेला चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावतील, त्या-त्या वेळेला चाकणकर यांनी चौकशीसाठी जायला हवे, असे मत विजया रहाटकर यांनी व्यक्त केले. तसेच पोलिसांना त्यांनी सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. चाकणकर यांनी पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

चाणकर तसेच त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी

दरम्यान, खरात प्रकरणामुळे चाकणकर चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. चाकणकर तसेच त्यांच्या कुटुंबीयांना एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारात चाकणकर कुटुंबाचाही संबंध आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. चाकणकर यांना तत्काळ अटक करावी, असी मागणी होत आहे. तर आमचा खरातशी काहीही संंबंध नाही, असं स्पष्टीकरण चाकणकर यांनी वारंवार दिलेलं आहे. त्यामुळे विजया रहाटकर यांच्या आवाहनानंतर चाकणकर नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...