AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांची परवानगी अन् फडणवीसांचा आदेश, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका, दिग्गज नेता पुन्हा स्वगृही परतला

पश्चिम महाराष्ट्रातील कागलचे नेते समरजीत घाटगे यांनी शरद पवारांची साथ सोडून पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून, त्यांनी आपल्या या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली आहे.

पवारांची परवानगी अन् फडणवीसांचा आदेश, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका, दिग्गज नेता पुन्हा स्वगृही परतला
Samarjeetsinh Ghatage bjp
| Updated on: Apr 08, 2026 | 11:05 AM
Share

पश्चिम महाराष्ट्रातील कागलच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव असलेले समरजीत घाटगे यांनी आज अखेर भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा घरवापसी करत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत हा सोहळा पार पडला.

शरद पवारांच्या भेटीनंतर घेतला निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सोडण्यापूर्वी समरजीत घाटगे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत त्यांनी माहिती दिली. मी पक्ष सोडत असल्याची आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याची भूमिका शरद पवार यांना स्पष्टपणे सांगितली आहे. त्यांनीही माझ्या निर्णयाला परवानगी दिली असून मला शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या निवडणुकीत कागलमधील काही विशिष्ट राजकीय परिस्थितीमुळे मला शरद पवारांच्या पक्षात जावे लागले होते, असेही त्यांनी जाहीररित्या सांगितले.

यावेळी समरजित घाटगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत. आज त्यांच्याच आदेशाने माझा भाजपमध्ये प्रवेश होत आहे. मी माझे संपूर्ण राजकीय भवितव्य आता त्यांच्यावर सोपवले आहे. येणारी २०२९ ची विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, हे देखील देवेंद्र फडणवीस ठरवतील. पक्षाचा जो आदेश येईल, तो मी पूर्ण क्षमतेने पाळणार आहे, असे समरजित घाटगे म्हणाले.

आता आणखी काही प्रयोगाला स्कोप नाही

चंद्रकांत पाटील यांनी मला राजकारणात सक्रिय केले, ते माझे गुरू आहेत. नोव्हेंबरमधील नगरपालिकेच्या निवडणुकीपासून ही प्रक्रिया सुरू होती. त्यांच्यामुळेच पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. मी आता कार्यकर्त्यांना आवाहन करु इच्छितो की, आता तुमच्या सर्वांचे ऐकून सर्व प्रयोग झालेले आहेत. आता आणखी काही प्रयोगाला स्कोप नाही. आपण आता भाजपमध्ये आलोय. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि रविंद्र चव्हाण तसेच पक्ष जे सांगेल त्यावर आपण काम करायचं. त्याप्रमाणेच पुढची वाटचाल ठेवायची, असे समरजित घाटगे यांनी मह्टले.

सध्या काहीही भाष्य करणे योग्य ठरणार नाही

कागलमधील त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात विचारले असता त्यांनी संयमी भूमिका घेतली. मी आणि हसन मुश्रीफ आम्ही दोघेही आता महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे त्यांच्यावर सध्या काहीही भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच खासदार धनंजय महाडिक आणि आपली राम-लक्ष्मणाची जोडी होती आणि अजूनही आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच पुन्हा सोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो, असे समरजित घाटगे यांनी म्हटले.

समरजीत घाटगे यांचा अल्पपरिचय

समरजीत घाटगे हे पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर जिल्हयातील कागल राजकारणातील एक प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ते कागलच्या ऐतिहासिक घाटगे घराण्याचे वारसदार आहेत. त्यांचे वडील स्व. विक्रमसिंह घाटगे हे कागलचे लोकनेते आणि शाहू साखर कारखान्याचे संस्थापक होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि श्री शाहू सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी अत्यंत समर्थपणे सांभाळली आहे.

समरजीत घाटगे यांनी २०१६ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांना पुणे पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणूनही जबाबदारी देण्यात आली होती. कागल विधानसभा मतदारसंघात त्यांचे मोठे जनमत आहे. त्यांनी सातत्याने शिक्षण, सहकार आणि शेती या क्षेत्रांत काम करून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काही स्थानिक राजकीय समीकरणे आणि हसन मुश्रीफ यांच्या महायुतीमधील प्रवेशामुळे त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ धरली होती. आता त्यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला