AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक घटना… सासूच्या निधनानंतर असं काय झालं, सूनेनं काही मिनिटांत घेतला अखेरचा श्वास

महाराष्ट्रातील धक्कादायक घटना... सासूच्या निधनानंतर काही मिनिटांत सूनेनं घेतला अखेरचा श्वास, 'त्या' काही तासांत नक्की घडलं तरी काय? परिसरात सर्वत्र खळबळ माजली आहे.

धक्कादायक घटना... सासूच्या निधनानंतर असं काय झालं, सूनेनं काही मिनिटांत घेतला अखेरचा श्वास
फाईल फोटो
| Updated on: Nov 05, 2025 | 1:16 PM
Share

छत्रपती संभाजीनगरच्या वेदांतनगर परिसरात मंगळवारी हृदयद्रावक घटना घडली. शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या रुक्मिणी रूपचंद परदेशी यांचं निधन झालं. याच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल. पण सर्वांना धक्का तेव्हा बसला जेव्हा सासूच्या निधनाची बातमी कळल्यानंतर सून विजया परदेशी यांनी देखील वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला… सासूच्या निधनानंतर काही मिनिटांत सूनेचा देखील मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

दोघीही विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या आई आणि पत्नी होत्या. रुक्मिणीबाई यांच्यावर नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, तर विजया परदेशी यांच्यावर बुधवारी दुपारी पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मंगळवारी शहरातील वेदांत नगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली. सासूच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांच्या सुनेचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रुक्मिणी रूपचंद परदेशी या दिवळीच्या सुट्टीत भावाला भेटण्यासाठी नाशिक येथे गेले होते. तेव्हा दुपारी घरी बसलेले असताना रुक्मिणी रूपचंद परदेशी यांचं निधन झाल्याची बातमी कळल्यानंतर कुटुंबातील सदस्य नाशिकच्या दिशेने निघण्याची तयारी करत होते.

सासूच्या निधनाची बातमी कळल्यानंतर सून विजया यांना हृदयविकाराचा झटका आला. अशात त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झालेले होता. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं…

सांगायचं झालं तर, सुसूच्या निधनाती बातमी समोर आल्यानंतर सूनेला मोठा धक्का बसला. कारण दोघींमध्ये आई – लेकीसारखं नातं होतं… अशात एकाच दिवशी सासू आणि सूनेचं निधन झाल्यामुळे सर्वत्र खळबळ  माजली आहे…

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रुक्मिणी आणि विजया यांमध्ये असलेलं नातं इतर सासू – सुनांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. कारण एकीकडे हुंडाबळी आणि इतर कारणांमुळे सुनांची हत्या आणि आत्महत्या होत आहे. तर दुसरीकडे  रुक्मिणी यांनी सासरी सून विजया यांचा आईसारखं प्रेम दिलं. नुकताच घडलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली होती. सासरी सतत होणाऱ्या जाचाला कंटाळून वैष्णवी हिने स्वतःचं आयुष्य संपवलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...