AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीचा 16 लाखांचा बोकड चोरीला, अलिशान कारमधून पळवला!

सांगलीत एका आलिशान चारचाकी गाडीतून हा बकरा लंपास करण्यात आल्याने खळबळ माजली आहे

सांगलीचा 16 लाखांचा बोकड चोरीला, अलिशान कारमधून पळवला!
सांगलीतील 16 लाखांचा बकरा चोरीला
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Dec 26, 2020 | 5:41 PM
Share

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश (Modi Bakra Sangli) असलेल्या 16 लाखाचा बोकड चर्चेचा विषय ठरला होता. त्याला आटपाडीच्या बाजारात 70 लाख रुपये इतक्या प्रचंड दराने मागणी झाली. पण तो त्यांनी विकला नाही. मात्र, त्यातील 16 लाखांचा बोकड आटपाडीच्या सोमनाथ जाधव यांनी विकत घेतला. आता हाच बोकड चोरी गेला आहे. शनिवारी पहाटे चोरांनी गोठ्यात शिरुन त्याला पळवलं. विशेष म्हणजे एका आलिशान चारचाकी गाडीतून हा बोकड लंपास करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. (Sangli’s goat worth Rs 16 lakh stolen)

मोदी बकऱ्याची राज्यभर चर्चा

सोलापुरातल्या सांगोल्याच्या बाबूराव मेटकरींच्या मोदी बोकडाची राज्यभर चर्चा झाली. या बोकडावर आटपाडीच्या बाजारात तब्बल 70 लाखांची बोली लागली होती. मात्र मेटकरींना तो दीड कोटींच्या खाली विकायचा नव्हता. त्यामुळं हा व्यवहार होऊ शकला नाही. याच बाजारात त्यांनी मोदी बोकडाचं बीज असलेल्या दुसऱ्या बोकडालाही आणलं होतं, हा बोकड त्यांनी 16 लाखांना विकला. जो आटपाडीच्या सोमनाथ जाधव यांनी विकत घेतला.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आटपाडी कार्तिक पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. येथे पशुपालक , मेंढपाळ मोठ्या संख्येने येत असतात. चालू वर्षी कोरोनामुळे यात्रा रद्द झाली. त्याऐवजी फक्त जनावरांचा बाजार रविवारी आणि सोमवारी भरविण्यात येतो. गेल्या महिन्यात मोठ्या उत्साहात हौशी मेंढपाळ पशूपालक यांनी आपल्या जनावरांसह हजेरी लावली होती. तिथंच हे दोन्ही बोकड पाहायला मिळाले होते.

बोकडासाठी 16 लाखांची किंमत काही कमी नाही. मात्र, जाधवांनी मोठ्या हौशीनं हा बोकड घेतला. मात्र, त्याच्यावर चोरट्यांची वाईट नजर पडली. आता हाच बोकड शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. बोकड शोधून देणाऱ्यांसाठी जाधव यांनी बक्षीसही ठेवल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या 

बारामतीत बोकड – शेळीचं लग्न, आहेर सरकारला देणार

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...