AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकार कोसळून नवीन पंतप्रधान येणार? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, म्हणाले, मोदींच्या जागी….

भाजप सरकार कोसळून नवीन पंतप्रधान येणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. त्याचबरोबर मोदींच्या जागी नवीन पंतप्रधान येणार असल्याचाही खळबळजनक दावा त्यांनी केला.

मोदी सरकार कोसळून नवीन पंतप्रधान येणार? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, म्हणाले, मोदींच्या जागी....
sanjay raut newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 10:55 AM
Share

दिल्लीसह देशातील विविध भागात आंदोलन केली जात आहेत. इंडिया आघाडीकडूनही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन केली आहेत. इंडिया आघाडी लवकरच दिल्लीच्या रामलीला मैदानात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या आधीपासूनच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सहा महिन्यानंतर मोदी सरकार कोसळणार असल्याचा दावा केला जात आहे. आता संजय राऊतांनी देखील मोदी सरकार कोसळणार असल्याचा दावा केला. पंतप्रधान मोदींच्या जागी नवीन नेतृत्व येणार असल्याचाही दावा राऊतांनी केला.

राज्यात दुष्काळाच्या परिस्थितीवरून संजय राऊतांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, ‘आम्ही 72 चा दुष्काळ पाहिला आहे. इंदिरा पंतप्रधान होत्या. त्यापेक्षाही गंभीर परिस्थिती आहे. कोकणात कधी दुष्काळ जाहीर झाला नव्हता’. तर नव्या सरकारवर संजय राऊत पुढे म्हणाले, ‘ मोदींच्या जागी नाव सांगू शकतो, पण आता सांगणार नाही. रेझिम चेंज म्हणजे रेझिम चेंज’.

दुष्काळ परिस्थितीवरून फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत म्हणाले की, ‘दुष्काळाचा सामना करण्यासाठी 50 हजार कोटींची गरज आहे. शेतकऱ्यांच्या तोंडावर 5 हजार रुपये फेकले. या राज्यकर्त्यांकडे निवडणूक लढण्यासाठी जो अतिरिक्त पैसा लागतो. तो प्रचंड आहे. तो भाजप असो शिंदे गट…सुनेत्रा पवार गट असो….बारामतीमधील सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत जे पॅनल निवडून आलं. त्या निवडणुकीत त्या गटाने 30 कोटी खर्च केले. जर सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत 25-30 कोटी खर्च होत आहेत. शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीत अर्धा तोळ्याचे दागिने, पैठणी, सफारी सूट दिला जात आहे. पैसे वाटले. तर राज्य गरीब आहे, असं कसं म्हणाल.

‘सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. त्यांच्याकडे तिजोरीच्या लुटीतून आलेली प्रचंड संपत्ती आहे.  सगळ्यात जास्त पैसे हे भाजप आणि शिंदे गटाकडे आहे. हा पैसा कुठून आला, कसा आला.. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री खुलासा करू शकतात. तर राज्याचे अर्धे कर्ज कमी होईल. दुष्काळाच्या संदर्भात ज्या रक्कमेची गरज आहे. ती तुमच्या मंत्र्यांकडून मिळेल. त्यांचे खिसे झटकले तरी सुद्धा 1 लाख कोटी जमा होतील. तुमचे एक माजी आमदार नाचत होते. त्यांच्यावर पैसे उडवले जात होते. पन्नास खोके एकदम ओके…ही गर्जना ज्यांनी दिली. ते भाजपमध्ये गेले. ते डान्सबारमध्ये नाचतात, तसे नाचत होते. त्यांनी पाच पंचवीस उडवल्याचे दिसत आहे. तेव्हा राज्याच्या डोक्यावर कर्ज आहे, कसं मानायचं. हे राज्य सरकार मानत नाही. सत्ताधारी पक्षाच्या खासदार-आमदारांनी ठेकेदारांच्या माध्यमांतून राज्य लुटलं आहे,असे ते पुढे म्हणाले.

Follow Us
मंत्र्यांचे खिसे झटकले तरी....; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी जमा होतील; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु....
Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु; उद्धव ठाकरे नेमका कोणता नवा संदेश देणार?
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर