बाप की चड्डी फडी पडी है…संजय राऊतांची तुफान बॅटिंग
शिवसेनेत फूट पडल्यानंतर दरवर्षी दसरा शिवसेनेचे दोन्ही गट स्वतंत्रपणे साजरा करतात. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा नेस्को सेंटर, गोरेगाव येथे तर उद्धव ठाकरे यांच्या मेळावा नेहमीप्रमाणे शिवतिर्थावर साजरा करण्यात येत आहे.

दसरा मेळाव्यात दोन शिवसेनेचे मेळावे झाले. शिवाजी पार्क येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांची तोफ धडाडली. या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘रेजिम चेंज’ करणार असे म्हटले की यांच्या बुडाला आग लागते. संजय राऊत म्हणाले जेन झीची भाषा मला आवडते. आदित्य ठाकरे आमच्या जेन झीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. जेन झीची घोषणा ही भारी आहेत. यात एका घोषणेचा उल्लेख संजय राऊत यांनी यावेळी केला. संजय राऊत म्हणाले की आपल्याला आवडलेली घोषणा म्हणजे एका छोटी मुलगी बोलत आहे की,’ बाप की चड्डी फडी पडी है, घर में चुल्हा नही जल रहा है, और बेटा बोल रहा है मोदी… मोदी…’
या देशात जेन झीचा जमाना आहे. जेन झीची लाट आली आहे. त्याचे नेतृत्व आपले आदित्य ठाकरे करत आहेत. त्या जेन झीची डोकी चालतात. भाजपाचा आटी सेलने राहुल गांधींना पप्पू ठरवण्यासाठी कोट्यवधी रक्कम खर्च केले, पण या जेन झीने छप्पन इंचाच्या नेत्याला छप्पन इंचाचा बंदर बनवले. छप्पन इंच का छोटा बंदर, बाल नरेंद्र..बाल नरेंद्र अशी घोषणा होत आहेत. पण माझी सर्वात आवडती जेन झीची घोषणा तुम्हाला माहिती आहे की काय ? तर माझी आवडती घोषणा एक छोटी मुलगी देत होती. ती घोषणा म्हणजे की,’ बाप की चड्डी फडी पडी है, घर में चुल्हा नही जल रहा है, और बेटा बोल रहा है मोदी… मोदी…’ अशी असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
संजय राऊत पुढे म्हणाले की आज माझ्यावर टीका होत आहे. अल्बेनियातील जनतेने सर्वोच्च न्यायालय जाळले. तेथील सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयाने घेतली, त्यामुळे जनतेने न्यायालयच पेटवून दिले आहे. इतके वर्षे मोदी सरकारने जनतेला अंधभक्त बनवले. काही झाले की जय श्रीराम बोलो, दुष्काळ आलाय, जय श्रीराम बोला, बेकारी वाढलीय जय श्रीराम बोलो, अरे इतकी वर्षे बोललो ना जय श्रीराम, आता तुम्हाला जय श्रीराम करण्याची वेळ आली आहे. हे असे सर्व सुरु असल्याची टीका यावेळी संजय राऊत यावेळी म्हणाले.
कोणत्या मुहूर्तावर राम मंदिराची उभारणी केली….
संजय राऊत म्हणाले की मला विचारले जाते मोदी सरकार कधी जाणार, राम मंदिरासाठी अभिजित मुहूर्त काढला होता, १२ जानेवारी २०२४ मध्ये, पण मोदी तुमचा मुहूर्त चुकलाय. राम मंदिरात कायकाय चोरी झाली माहितीये. प्रभु रामाचे अलंकार, सीता माईची कर्ण फुलं, २७ मंगळसुत्र, श्रीरामाच्या पादुका चोरीला गेल्या, सीसीटीव्ही बंद करुन दानपेट्या चोरल्या आहे. त्यामुळे तुमचा मुहूर्त चुकला आहे. आता मोदी, शाह एप्रिलच्या अखेरीस जाणार आणि ग्यानुही जाणार असेही संजय राऊत म्हणाले.
