AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिथे ज्याची ताकद त्याच्या नेतृत्वात लढायचं, आघाडीचं ठरलं; राऊतांनी सांगितला नवा फॉर्म्युला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीमध्ये कोणताही बेबनाव होऊ नये म्हणून महाविकास आघाडीने नवा फॉर्म्युला ठरवला आहे. (sanjay raut share maha vikas aghadis new formula for civic polls)

जिथे ज्याची ताकद त्याच्या नेतृत्वात लढायचं, आघाडीचं ठरलं; राऊतांनी सांगितला नवा फॉर्म्युला
संजय राऊत
| Updated on: Feb 20, 2021 | 4:31 PM
Share

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीमध्ये कोणताही बेबनाव होऊ नये म्हणून महाविकास आघाडीने नवा फॉर्म्युला ठरवला आहे. ज्या महापालिकेत ज्या पक्षाची ताकद अधिक आहे. त्या पक्षाच्या नेतृत्वात निवडणुका लढायच्या असं महाविकास आघाडीत ठरलं आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली. आघाडीच्या या नव्या फॉर्म्युल्यामुळे आघाडी बळकट होणार असून भाजपची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता अधिक बळावली आहे. (sanjay raut share maha vikas aghadis new formula for civic polls)

संजय राऊत आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देतानाच आघाडीचा स्थानिक पातळीवरील समन्वयाचा नवा अजेंडाही सांगून टाकला. आमचं ठरलं आहे. किंबहूना आम्ही निर्णय घेतला आहे. ज्या शहरात… ज्या पालिकेत ज्या पक्षाची ताकद अधिक आहे. तिथे त्या पक्षाने नेतृत्व करावं. इतरांनी त्यांच्या नेतृत्वात लढावं. हा आमचा फॉर्म्युला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे. शिवसेनाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याने या पालिका निवडणुकीत शिवसेना नेतृत्व करेल. आघाडीतील इतर पक्ष शिवसेनेसोबत येतील. असं राऊत म्हणाले.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नेतृत्व

पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेत राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकेची निवडणूक कशा प्रकारे लढायची याबाबत आम्ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करू. पुणे, पिंपरी-चिंचवडची सत्ता राष्ट्रवादीने ग्यावी. तर मुंबई, ठाण्याची शिवसेना घेईल, असं सांगतानाच आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आता पुण्यात विधानसभेच्या दोन जागांवर पोट निवडणूक होत आहेत. एक जागा राष्ट्रवादी लढवणार आहे, तर दुसरी शिवसेना लढवणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आमच्यात खेचाखेची नाही

एकत्र निवडणुका लढल्यामुळे काय होतं हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भूमिका आहे आणि मानसिकताही एकत्र राहण्याची आहे. आमच्यात कोणतीही खेचाखेची नाही. महाराष्ट्रातील सत्ता आम्ही पाच वर्ष पूर्ण करू. तसेच आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एकत्र राहून सत्तेचं वाटप करू, असं ते म्हणाले. (sanjay raut share maha vikas aghadis new formula for civic polls)

संबंधित बातम्या:

पुणे महापालिकेसाठी सेना-राष्ट्रवादीची आघाडी, पटोले म्हणतात “पाठून वार करण्याची भूमिका नाही”

पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादीचं ठरलं, संजय राऊतांकडून मोठी घोषणा

महाविकास आघाडीचं ठरलं ! भाजपला रोखण्यासाठी ग्रामपंचायतही एकत्र लढणार !

(sanjay raut share maha vikas aghadis new formula for civic polls)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.