AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बियर 80 रुपये, पेट्रोल 112 रुपये, घुमना है की झुमना है?; संजय राऊतांनी उडवली खिल्ली

Sanjay Raut on Government : आज शिर्डीत अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.

बियर 80 रुपये, पेट्रोल 112 रुपये, घुमना है की झुमना है?; संजय राऊतांनी उडवली खिल्ली
Sanjay Raut on Fuel PriceImage Credit source: Google
| Updated on: Jun 02, 2026 | 7:04 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज शिर्डीत मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. खासदार संजय राऊत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, सुनिल शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित आहेत. या मेळाव्यातील भाषणात खासदार संजय राऊत यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. राऊत यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

गाड्यांच्या ताफ्यावरून CM फडणवीसांना टोला

मध्य-पूर्वेतील तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. यामुळे जागतिक पातळीवर तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी भारतातही इंधनाचे दर वाढले आहेत. यावर टीका करताना राऊत यांनी म्हटले की, ‘काही दिवसापूर्वी फडणवीस शिर्डीत आले वंदेभारत ट्रेनने, जाताना ताफा घेऊन गेले. इंधन बचतीसाठी पहिल्या दिवशी मोटरसायकलवर आले. 15 दिवसात आता 25 गाड्यांचा ताफा होता.’

पेट्रोल 112 रुपये आणि बियर 80 रुपये अशी स्थिती – राऊत

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मोदींच्या ताफ्यात तिसऱ्या दिवशी 48 गाड्या होत्या, मी मोजल्या. मला वाटलं फुटपाथवर उभं रहावं आणि मोदींना मेलोडी चॉकलेट द्यावं. इंधनाचे भाव वाढले, सत्ताधाऱ्यांनी दोन दिवस नाटक केलं. पेट्रोल 112 रुपये आणि बियर 80 रुपये अशी स्थिती आहे. घुमना है की झुमना है. मोदींनी मनकी बात करुन लोकांना सांगावं. गंदा है पर धंदा है. पंतप्रधान पाणी पिण्याबाबत मार्गदर्शन करतात. हे त्यांचे काम आहे का ?

देशात दोनच सेना, एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना

शिवसेनेबाबत बोलताना राऊत म्हणाले की, या देशात दोनच सेना आहेत. एक सीमेवर भारतीय सेना आणि दुसरी महाराष्ट्रात शिवसेना. नरेंद्र मोदी दिल्लीत भेटतात, पण डोळ्यात डोळे घालण्याची हिंमत होत नाही. अमित शहा, तुम्ही शिवसेनेच्या पाठीत जो खंजीर खुपसला. एक दिवस तोच खंजीर तुमच्या पाठीत खुपसणार. शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आता मागे हटायचे नाही. आम्ही सर्व शिवसैनिकांच्या पाठीशी आहोत.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात