संजय राऊतांची आई टीव्ही लावून बसली होती, गोड बातमीबद्दल प्रवीण राऊतांनी सांगितलं

| Updated on: Nov 09, 2022 | 5:23 PM

आज जे अश्रू होते ते आनंदाचे अश्रू होते.

संजय राऊतांची आई टीव्ही लावून बसली होती, गोड बातमीबद्दल प्रवीण राऊतांनी सांगितलं
गोड बातमीबद्दल प्रवीण राऊतांनी सांगितलं
Image Credit source: tv 9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादानं संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. सगळ्या गोड बातम्या गेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला कुणाला काही सांगायची गरज नाही. संजय राऊत हे सुटकेनंतर स्मृतीस्थळावर जातील. तसेच उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी जाण्याची शक्यता संजय राऊत यांचे बंदू प्रवीण राऊत यांनी व्यक्त केली.

जे शिवसैनिकांच्या मनात आहे ते समोर येईल. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व शिवसैनिक हे संजय राऊत यांच्यासोबत असतील. संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली आहे. मी त्यांची निर्दोष सुटका केली असं म्हणत नाही, असंही प्रवीण राऊत म्हणाले. शिवसैनिक उत्स्फूर्तपणे आपला जल्लोष साजरा करतील, असं प्रवीण राऊत यांनी सांगितलं.

तुम्ही ट्वीटर बघताय. टीव्हीवर बातम्या देताय. त्यामुळं तोफ दणाणणार की, नाही ते तुम्हाला माहीत असेल. संजय राऊत यांची आई ही सुनावणीकडं पाहत होती. आई टीव्ही लावून बसली होती. टीव्हीच्या माध्यमातून आईपर्यंत ही गोड बातमी पोहचली. त्यामुळं मीडियाचे आभार असंही प्रवीण राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत यांच्या आईच्या डोळ्यात ते जैलमध्ये जात होताना अश्रू होते. ते दुःखाचे अश्रू होते. पण, आज जे अश्रू होते ते आनंदाचे अश्रू होते. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांनी अटक करण्यात आली होती. शंभर दिवस ते जेलमध्ये होते. त्यानंतर आता आज त्यांची जामिनावर सुटका झाली. ही वार्ता ऐकताचं शिवसैनिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला.