AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Pandit : मोठी बातमी! आमदार गोपीचंद पडळकरांना जाब विचारणाऱ्या संतोष पंडित यांना अटक

मोठी बातमी! आमदार गोपीचंद पडळकरांना जाब विचारणाऱ्या संतोष पंडित यांना अटक करण्यात आली आहे. संतोष पंडित यांना अटक केल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.

Santosh Pandit : मोठी बातमी! आमदार गोपीचंद पडळकरांना जाब विचारणाऱ्या संतोष पंडित यांना अटक
santosh panditImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 03, 2026 | 8:46 AM
Share

पुण्यातील कोथरूड परिसरात विकासकामांवरून मंत्र्याना प्रश्न विचारणारे प्रसिद्ध युट्युबर संतोष पंडित हे कायदाच्या कचाट्यात सापडले आहेत युट्यूबवरून आक्षेपार्ह आणि अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोपानंतर संतोष पंडित यांना कोथरुप पोलिसांनी अटक केली आहे. पंडित यांना 3 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजता अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना राहत असलेल्या ठिकाणावरून अटक केली आहे. त्यांच्यावर कारवाई केल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. अगदी कालच संतोष पंडित यांनी कारच्या नंबर प्लेटवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना जाब विचारला होता.

मंत्री चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह, बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित केल्याचा संतोष पंडित यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर त्यांच्या विरोधात कोथरुड पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. सारिका कांबळे नावाच्या महिलेने त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर कोथरुड पोलिसांनी मध्यरात्री एक वाजता संतोष पंडित यांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

संतोष पंडित यांनी त्यांच्या युट्युब अंकाऊंटवरून मंत्री चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्याविरोधात एका आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओच्या माध्यमातून बदनामी केल्याचा आरोप संतोष पंडित यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्येही तक्रार दाखल करण्यात आली. संतोष पंडित यांचा व्हिडिओ हजारो जणांनी पाहिला आहे. त्यानंतर सारिका कांबळे यांनी कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यांनी तक्रार दिल्यानंतर संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय सहिंतेच्या कलम 75(1)(iv), 75(3), 356(2), 352 अंतर्गत कारवाई करण्यात आली. यात महिती तंत्रज्ञान अधिनिम कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांकडून 3 सप्टेंबर पहाटे 1 वाजून 28 मिनिटाला त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्यांच्या राहत्या घरी पोहोचले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनील माने यांच्याकडे सोपवण्यात आलाय. त्यांनी व्हिडिओतून कोथरूडमधील विकासकामांवर प्रश्न उपस्थित केले, त्यावेळी अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणाचा तपास कोथरुड पोलीस करत आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट