मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, सारथी संस्थेला कोट्यवधींचा निधी मंजूर, थेट शासनादेश जारी

Maratha Student : मराठा विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. सारथी संस्थेला 35 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना संशोधन, प्रशिक्षणासाठी ही निधी वितरित केला जाणार आहे.

मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, सारथी संस्थेला कोट्यवधींचा निधी मंजूर, थेट शासनादेश जारी
Sarathi Sanstha to get 35 Crore
Image Credit source: Google
| Updated on: Jun 11, 2026 | 10:01 PM

राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने ओबीसी प्रवर्गासाठी असणाऱ्या योजना मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता मराठा विद्यार्थ्यांसाठी आणखी एक खुशखबर आहे. सारथी संस्थेला 35 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना संशोधन, प्रशिक्षणासाठी ही निधी वितरित केला जाणार आहे. नियोजन विभागाने याबाबतचा शासनादेश जारी केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सारथीसाठी 35 कोटींचा निधी मंजूर

सारथी म्हणजेच ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ ही महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अंतर्गत कार्य सरकारी संस्था आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था काम करते. या संस्थेद्वारे MPSC, UPSC, बँकिंग, रेल्वे आणि इतर शासकीय नोकऱ्यांच्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग आणि विद्यावेतन दिले जाते. अशातच आता या संस्थेला सरकारकडून 35 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

सरकारकडून आदेश जारी

सरकारने सारथीबाबत शासनादेश जारी केला आहे. यात नियोजन विभागाने म्हटले की, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीस सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता “ओ-02, 2225, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक यांचे कल्याण, 3, मागासवर्गीयांचे कल्याण, 102, आर्थिक विकास (01) मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी यांचे कल्याण यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) साठी 35 कोटी 34 लाख 23 हजारांचा निधी देण्यात आला आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी उपरोक्त निधी कोषागार कार्यालय यांच्याकडून आहरित करण्यापूर्वी तसेच राज्य शासनाची कार्यनियमावली, वित्तीय नियमावली, अर्थसंकल्पिय नियम पुस्तिकेतील तरतुदी व सर्व अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करताना, कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याची आणि सदर निधी खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास व संबंधितांना सादर करण्याची जबाबदारी ही व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांची राहील.

Follow Us