AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साताऱ्यात भीषण अपघाताचा थरार, महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलेल्यांवर काळाचा घाला, 4 जिगरी मित्रांचा जागीच मृत्यू

साताऱ्यात भीषण झाला. महालक्ष्मीच्या दर्शनावरून परताना चार मित्रांवर काळाने घाला घातला. भीषण अपघातात 4 जिगरी मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

साताऱ्यात भीषण अपघाताचा थरार, महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलेल्यांवर काळाचा घाला, 4 जिगरी मित्रांचा जागीच मृत्यू
Satara news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 9:56 AM
Share

साताऱ्यात कराडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. साताऱ्यातील पुणे-बेंगळुरू महामार्गाच्या उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री 11 वाजता कार आणि ट्रकचा भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात 4 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्व मित्र हे कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून घरी परतत असताना त्यांची कार एका ट्रकला धडकली. यात चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण साताऱ्यात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरहून साताऱ्याला परतताना घात झाला 

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व तरुण दसऱ्यानिमित्त कोल्हापूरला गेले होते. कोल्हापुरात महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर रात्री साताऱ्याच्या दिशेने निघाले. रस्त्यावर असताना त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. अपघातातील सर्व तरुण हे साताऱ्यातील खटावच्या कातरखटावचे आहेत. काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या उड्डाणपुलावर त्यांच्या कारचा अपघात झाला. या उड्डाणपुलावरील हा पहिलाच अपघात असल्याचे सांगितले जात आहे. तर या अपघातामधील जखमींवर कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

अपघातातील मृतांची नावे आली समोर  

अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे समोर आली आहेत. तेजस देशमुख (चालक वय- 25 वर्षे), सागर निंबाळकर (वय-23 वर्षे), सुयश चिंचकर (वय-20 वर्षे), रोहित धोत्रे (वय-21 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर काही जण जखमी झाले आहेत. ऋतुराज दुबळे (वय-21 वर्षे), शंतनू शिंगाडे (वय-20 वर्षे), अमन तांबोळी (वय-23 वर्षे) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. कातरखटाव गावातील तरुणांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण मुलांच्या अपघाती मुलाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ज्या उड्डाण पुलावर हा अपघात झाला. तो काही दिवसांपूर्वी खुला करण्यात आला होता. या अपघातामुळे उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित झाली आहे. या अपघातानंतर नागरिकांकडून रस्ते सुरक्षा वाढवावी अशी मागणी होऊ लागली आहे. नागरिकांच्या मागणीवर आता स्थानिक प्रशासन काय निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

Follow Us
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!