Video: गेला गेला गेला, ऐ सोड अन् गेला, उसानं ओव्हरलोड झालेला ट्रक कालव्यात कोसळतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद

गळीप हंगाम सुरू झाल्यानंतर ट्रक आणि ट्रॅक्टर जवळून प्रवास करीत असताना किंवा गाड्या चालवत असताना चार हात लांब राहतात. कारण उसाने भरलेल्या ट्रक आणि ट्रॅक्टरचे नकळतपणे अपघात होतात.

Video: गेला गेला गेला, ऐ सोड अन् गेला, उसानं ओव्हरलोड झालेला ट्रक कालव्यात कोसळतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद
कालव्यात उसाने भरलेला ट्रक कोसळत असतानाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 8:43 AM

सातारा – गळीप हंगाम सुरू झाल्यानंतर ट्रक (truck) आणि ट्रॅक्टर जवळून प्रवास करीत असताना किंवा गाड्या चालवत असताना चार हात लांब राहतात. कारण उसाने भरलेल्या ट्रक आणि ट्रॅक्टरचे नकळतपणे अपघात होतात. साताऱ्या (satara) जिल्ह्यातील वाई (wai) तालु्क्यात पसरणीतल्या भैरवनाथ परिसरात उसाने भरलेला ट्रक शुक्रवारी दुपारी कालव्यात कोसळला आहे. ट्रक पाण्यात कोसळणार असल्याची चालकाला जाणीव झाल्याने चालकाने एका बाजूला झुकलेला ट्रक कालव्याच्या शेजारी उभा केला होता. तसेच ट्रकला दोरीच्या साहाय्याने एका बाजूला ओढण्याचा प्रयत्न देखील चालकाने लोकांच्या साहाय्याने केला आहे. लोकांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर सुध्दा ट्रक पाण्यात कोसळत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ तिथं अपघात पाहत असलेल्या अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे. ट्रक पाण्यात कोसळल्यानंतर कालव्यातील पाणी कालव्याच्या बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय.

नेमकं व्हिडीओत काय आहे ?

ज्यावेळी चालक इतर लोकांच्या साहाय्याने ट्रक एका बाजूला खेचण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी कालव्याच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या मुलांनी हा व्हिडीओ तयार केला आहे. उसाने भरलेला ट्रक पाण्यात कोसळतोय हे पाहत असताना व्हिडीओ तयार करणारा तरूण, कल्ला, कल्ला, गेला…कशाला.. पुढं जाती…कल्ला कल्ला गेला…गेला…गेला…ये सोडं…सोडं गेला…गेला…कॅनेल.. आता पाणी साठणार इथं… हे हुनारं हाय इथं..मागं सरा तुम्ही…आता सगळं पाणी तुंबलं…पाणी तुंबणार आहे आता..पाणी तुंबणार आहे आता…एकजण म्हणतोय नाही तुंबायचं…जातंय पाणी..उतार हाय सगळा..पाणी जाणार सगळं…पाणी जाग्यावं खाली झालंय… असा अनेक तरूणांचा संवाद व्हिडीओ ऐकायला मिळतोय.

या घटनेत ट्रकचे आणि ऊसाचे मोठे नुकसान

यंदा गंळीप हंगाम अधिक चालणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. तसेच जोपर्यंत शेतक-यांचे ऊस पुर्णपणे संपत नाही. तोपर्यंत कारखाने बंद करू नये अशी सुचना देखील राज्य शासनाने कारखान्यांना केली आहे. ट्रक पाण्यात कोसळल्यानंतर कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा कालव्यातील ट्रक आणि ऊस पाण्यातून बाहेर काढण्यात आला. ऊस पाण्यात भिजल्याने शेतक-याला अर्थिक फटका बसेल.

Video: आपचा ताप आम्हाला नाही..गोपीनाथ मुंडेंना जे दिसलं ते काँग्रेसवाल्यांना कळालं नाही का? मुंडेंची भविष्यवाणी चर्चेत

VIDEO | स्टेशनवर किसिंगचा कहर, मुंबईतल्या त्या जोडप्याची जोरदार चर्चा, बिचाऱ्यांवर जीआरपीकडून गुन्हा

Dreams | स्वप्नात तुम्हाला नदीचे वाहते पाणी दिसले का? मग आयुष्यातून सर्व त्रास संपलाच म्हणून समजा, समजून घ्या तुमची स्वप्नं तुम्हाला काय सांगतात

Non Stop LIVE Update
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.