AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजेंमधील वाद पुन्हा उफाळला, संजय राऊतांच्या अनाजी पंतांच्या टीकेवरून शिवेंद्रराजे आक्रमक!

जे संजय राऊत आज छत्रपती घराण्याबद्दल बोलतात त्यांना तो अधिकारच नाही असं म्हणत त्यांनी सातारा आणि कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यांचा राजकीय इतिहास सांगितला.

शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजेंमधील वाद पुन्हा उफाळला, संजय राऊतांच्या अनाजी पंतांच्या टीकेवरून शिवेंद्रराजे आक्रमक!
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 04, 2023 | 4:12 PM
Share

साताराः राज्यातील पोटनिवडणुकांचे निकाल लागताच राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.वेगवेगळ्या मुद्यावरून राजकारण तापलेले असतानाच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सध्या कोल्हापूर नंतर सातारा दौऱ्यावर आहेत. सातारा दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी छत्रपती घरण्यावर आणि भाजपवरही टीका केली. त्यानंतर भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर देत संजय राऊत यांना छत्रपती घराण्यार बोलायचा अधिकार नाही अशा शब्दात त्यांनी त्यांना सुनावलं आहे.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्यु्त्तर देताना ते म्हणाले की, संजय राऊत आणि ठाकरे गटाला छत्रपती घराण्याबद्दल एवढा आदर होता.तर त्यांनी तो आदर राज्यसभेच्यावेळी का ठेवला  नाही.

कोल्हापूरच्या संभाजीराजे यांना राज्यसभेचं तिकीट न देता ते त्यांना का डावलण्यात आले. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती घराण्याबद्ददल न बोललेच बरं असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

जे संजय राऊत आज छत्रपती घराण्याबद्दल बोलतात त्यांना तो अधिकारच नाही असं म्हणत त्यांनी सातारा आणि कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यांचा राजकीय इतिहास सांगितला. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यावर ठाकरे घराण्याने अन्याय केला आहे.

मात्र भाजपने तसं होऊ दिले नाही.देशाच्या पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र मोठं काम केले आहे. तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांनीही काम मोठं केले आहे. त्यांच्यामुळेच आम्ही आज आमदार असल्याचेही त्यानी सांगितलं.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल गौरवोद्गगारही काढले आहेत. त्यांच्यासारख्या कतृत्वावान माणसामुळे राज्यातील भाजप आणि देशातील भाजप नरेंद्र मोदी यांच्यामुळे घोडदौड करत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.