Pratap Asbe Died : ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

महाराष्ट्राच्या राजकराणाची सखोल जाण असलेले तसेच राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जायचे.

Pratap Asbe Died : ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
pratap asbe
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2026 | 8:11 PM

Pratap Asbe Died : महाराष्ट्राच्या राजकराणाची सखोल जाण असलेले तसेच राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जायचे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचाराला साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दादर पार्कमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

आसबे यांना सर्व राजकीय संदर्भ तोंडपाठ

प्रताप आसबे हे राजकीय पत्रकारितेतील मोठं नाव आहे. 1990 च्या दशकात त्यांनी अनेक नवख्या पत्रकारांना राजकीय पत्रकाराचे धडे दिले. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय चाललंय? याची सगळी माहिती त्यांना तोंडपाठ असायची. एखादा ऐतिहासिक संदर्भ विचारायचा असेल तर प्रताप आसबे हेच हक्काचे स्थान होते. आसबे यांनी महाराष्ट्र टाईम्स या वृत्तसंस्थेत पत्रकारिता केली. त्यांनी केलेले राजकीय विश्लेषण हे अचूक आणि अभ्यासपूर्ण असायचे.

Loading...

मुंबई हीच कर्मभूमी राहिली

आसेब यांच्या पत्रकारितेची दखल घेत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना मानाचा दिनू रणदिवे पुरस्कार मिळाल. 2020-21 साली या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. आसबे हे या पुरस्काराचे पहिले मानकरी होते. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. परंतु त्यांनी मुंबईत पत्रकारिता केली. त्यामुळे मुंबई हीच त्यांची कर्मभूमी राहिली. त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us