AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी-चिंचवडमध्ये फुगेवाडीत एकाच दिवशी ७ जणांच्या मृत्यूने खळबळ; विषारी दारु की अन्य कारण ?

पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी भागात पाच जणांचा मृत्यू झाल्याचा फलक झळकल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पाच नागरिकांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याचा उलगडा पोस्टमार्टेम रिपोर्टनंतर येईल असे म्हटले जात आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये फुगेवाडीत एकाच दिवशी ७ जणांच्या मृत्यूने खळबळ; विषारी दारु की अन्य कारण ?
Pugewadi Death death Case
| Updated on: May 28, 2026 | 10:39 PM
Share

Pugewadi Death Case : पिंपरी- चिंचवड येथील फुगेवाडी परिसरात एकाच भागात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच दिवशी सात जणांचा मृत्यू झाल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. फुगेवाडीतील गावच्या आझाद चौकात एका फलकावर या मृतांची नावे लिहिल्यानंतर परिसरातील लोकांना या घटनेसंदर्भात माहिती कळाली आणि संपूर्ण परिसरात भीती पसरली. हे मृत्यू अवैध हातभट्टीच्या दारुमुळे झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

हातभट्टीच्या दारूने मृत्यू ?

एकाच वेळी अशा प्रकारे सात जणांचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर फुगेवाडीत विविध तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत. गावाच्या आझाद चौक आणि परिसरात दोन ठिकाणी हातभट्टीची दारु आणि गावठी दारुचे अड्डे सुरु असल्याची चर्चा आहे.यामुळे या सात नागरिकांचा मृत्यू याच अड्ड्यावरील विषारी दारुमुळे झाला असावा संशय आहे. या संदर्भात हातभट्टी दारुच्या अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून या प्रकरणात कारवाईची मागणी होत आहे.

पोलिसांचा प्राथमिक तपासात मोठा खुलासा

या प्रकरणाचे गांभीर्य पाहून या प्रकरणाचा दापोडी पोलिसांनी (Dapodi Police) तपास सुरू केला आहे. पोलिसांनी केलेल्या या तपासानंतर या प्रकरणातील नागरिकांचे सर्व दावे पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानंतर या  घटनांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटना वेगवेगळ्या आणि स्वतंत्र असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पाच मृतांपैकी पैकी चार जणांना दारुचे व्यसन नव्हते तसेच त्यांच्या नातेवाईकांनी या संदर्भात कोणतीही तक्रार केली नसल्याचे दापोडी पोलिसांनी म्हटले आहे.

मृतांची नावे आणि पोलिसांची माहिती

दापोडी पोलिसांच्या माहितीनुसार, मृत पावलेल्या पाचही नागरिकांची पार्श्वभूमी आणि मृत्यूचे प्राथमिक कारण जाहीर करण्यात आले आहे.

1.पांडुरंग फुगे (वय ५७) : यांचा मृत्यू पूर्णपणे नैसर्गिक (Natural Death) कारणाने झाला आहे.

2.विजय राठोड (वय ३१) आणि राजेंद्र राठोड (वय ३४ ) : या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart Attack) झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे.

3. राजेंद्र राजपूत (वय५१ ) : हे घरात असताना अचानक बाथरूममध्ये चक्कर येऊन पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला.

4. अकबर पठाण (वय ५२ ) : हे गेल्या १५ वर्षांपासून प्रचंड दारु पित (Alcohol Addiction) होते. त्यांचा मृत्यू अतिमद्यप्राशनाने किंवा इतर आजाराने झाल्याची शक्यता आहे.

5. आनंद काशिनाथ निकाळजे

6. आनंद पांडेराव देसाई

पोस्टमार्टेमची प्रतिक्षा

याबाबत दापोडी पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. एकाच दिवशी झालेल्या या सात जणांच्या मृत्यू मागे संघटीत गुन्हा किंवा विषारी दारू प्राशन हे कारण प्रथमदर्शनी दिसत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, तरीही या सर्व मृतांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमके मृत्यू कारण काय आहे हे कळू शकेल असे म्हटले जात आहे.

Follow Us
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...