AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुपाली चाकणकरांकडे इतर नेत्यांचे व्हिडीओ, म्हणून त्यांना…, अशोक खरात प्रकरणात महिला कार्यकर्त्याच्या आरोपांनी मोठी खळबळ

अशोक खरात प्रकरणात काँग्रेसच्या कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सांगीता तिवारी यांच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

रुपाली चाकणकरांकडे इतर नेत्यांचे व्हिडीओ, म्हणून त्यांना..., अशोक खरात प्रकरणात महिला कार्यकर्त्याच्या आरोपांनी मोठी खळबळ
rupali chakankarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 28, 2026 | 5:30 PM
Share

अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या, त्यांना या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. दरम्यान त्यानंतर आता अशोक खरात प्रकरणावर बोलताना काँग्रेसच्या कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर बाईंकडे इतर नेत्यांचे व्हिडीओ आहेत. त्यामुळे हे व्हिडीओ बाहेर येऊ नये म्हणून या बाईला आता क्लिन चीट देण्याचा प्रयत्न होत आहे. भाजप चाकणकर यांना आपल्या वॉशिंग मशिनमध्ये धुवून काढेल असं संगीता तिवारी यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या संगीता तिवारी?  

मी अजितदादांसोबत पक्षात होते, पण मी मुळात काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी पुन्हा आता काँग्रेसमध्ये आले आहे. त्यामुळे मी आता आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात काम करत आहे. अजितदादांचा विमान अपघात झाला, त्यानंतर आता पक्षाला कोणी उरलं नाही. त्यांच्या विमान अपघातासंदर्भात चौकशी देखील होत नाहीये, त्यांच्या घरातील लोक देखील चौकशीसंदर्भात बोलत नाहीयेत. फक्त एकटे रोहित पवार हे या विमान अपघातासंदर्भात बोलत आहेत, असं संगीता तिवारी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  अशोक खरातचा अजित पवार यांच्या मृत्यूशी संबध आहे, कारण या खरातच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे कुठून आले? आणि हे पैसे अजित दादा यांचा विमान अपघात घडण्याच्या आदल्या दिवशी तसेच विमान अपघाताच्या दिवशी आले होते, त्याचा आणि याचा काहीतरी संबंध आहे, आणि याला जबाबदार रुपाली चाकणकर या आहेत, असा गंभीर आरोप यावेळी संगीता तिवारी यांनी केला आहे.

चाकणकर यांना सुनील तटकरे यांना अजित पवार यांच्या जागी बसवायचे होते, त्यामुळे त्यांनी हे सगळं केलं आहे. हेच तटकरे आणि चाकणकर गुवाहाटीला पुजेसाठी गेले होते.  रुपाली चाकणकर बाईंकडे इतर नेत्यांचे व्हिडीओ आहेत. त्यामुळे हे व्हिडीओ बाहेर येऊ नये म्हणून या बाईला आता क्लिन चीट देण्याचा प्रयत्न होत आहे. भाजप चाकणकर यांना आपल्या वॉशिंग मशिनमध्ये धुवून काढेल, असे खळबळजनक आरोप संगीता तिवारी यांच्याकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट