AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब असताना गर्जना डरकाळी होती, आता फक्त…शहाजी बापू पाटलांची ठाकरे बंधूंवर सडकून टीका

शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी गर्जना मोर्चावरुन ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. गर्जना ही बाळासाहेब असताना व्हायची, असं म्हणत त्यांनी टीका केली.

बाळासाहेब असताना गर्जना डरकाळी होती, आता फक्त...शहाजी बापू पाटलांची ठाकरे बंधूंवर सडकून टीका
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 12:24 PM
Share

देशभरात निवडणूक आयोगाच्या वातावरण तापलं आहे. या आयोगाच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीने शिवाजी पार्कात मोर्चा काढला. त्यानंतर आता  ठाकरे बंधूंच्या पुढाकाराने मुंबईत गर्जना मोर्चा काढला आहे. मुंबईतील या मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले आहेत. या मोर्चातून विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. विरोधकांच्या टीकेनंतर आता सत्ताधाऱ्यांनी थेट ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. बाळासाहेब असताना डरकाळी होती, आता फक्त मांजराचा आवाज राहिल्याची टीका माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी ठाकरे बंधूंवर केली आहे.

गर्जना मोर्चा मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर धडकणार 

विरोधकांच्या गर्जना मोर्चासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईला पोहोचले आहेत. या मोर्चामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसहित शिवसैनिक आणि मनसैनिक देखील शेकडोंच्या संख्येने पोहोचले आहेत. विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते मोर्चात सामील झाले आहेत. मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर मनसेचा गर्जना मोर्चा पोहोचणार आहे. आता मोर्चावर शिंदे गटातून टीका करण्यात आली आहे. शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी थेट ठाकरे बंधूंवर टीका केली आहे.

आता फक्त मांजरांचा आवाज, शहाजी बापू पाटलांची जोरदार टीका

शहाजी बापू पाटील म्हणाले, ‘ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा नसून मांजरांचा आवाज राहिला आहे. बाळासाहेब ठाकरे असताना गर्जना डरकाळी होती. आता फक्त मांजरांचा आवाज राहिला आहे. एसआयआर प्रक्रियेला आमचा पाठिंबा आहे.  एसआयआर प्रक्रिया पहिल्यांदा राबवली जात नाही, काँग्रेस पक्ष असताना सात आठ वेळा राबवली गेली होती’. दरम्यान शहाजी बापू पाटील यांनी दुष्काळावरही भाष्य केलं. शहाजी बापू पाटील यांनी वाढदिवसानिमित्त राज्यातील सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत दुष्काळामुळे स्थगित केल्याची घोषणा केली. सांगोला तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आल्यानंतर सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची मागणी पूर्ण होते का, हे पाहावे लागेल.

Follow Us
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू