AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Health Update : शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती कशी? डॉक्टरांचा मोठा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Sharad Pawar Health Update : शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती कशी? डॉक्टरांचा मोठा सल्ला
sharad pawar
| Updated on: Feb 25, 2026 | 10:21 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) मध्ये शरद पवार उपचार घेत होते. आज डॉक्टरांनी शरद पवार यांना डिस्चार्ज दिला आहे. त्यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे, अशी माहिती शरद पवार यांचे अतिशय जवळचे मित्र आणि विश्वासू सहकारी विठ्ठल मणियार यांनी दिली. शरद पवार पुढील काही दिवस मुंबईतील आपल्या निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत, असेही विठ्ठल मणियार यांनी सांगितले.

शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे चार दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. सलग चार दिवस तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेतल्यानंतर आज सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, थकवा आणि काही चाचण्यांच्या कारणास्तव पवारांना रुग्णालयात दाखल केले होते. या चार दिवसांत त्यांच्या काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. आता या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट समाधानकारक आले आहेत. तसेच त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याने डॉक्टरांच्या पथकाने त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली

शरद पवार यांचे अतिशय जवळचे मित्र आणि विश्वासू सहकारी विठ्ठल मणियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातून डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी शरद पवार यांना पुढील काही दिवस पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सततचे दौरे आणि सभांमुळे त्यांच्या प्रकृतीवर ताण येत आहे, असे डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळेच आता ते पुण्यातून थेट मुंबईच्या सिल्वर ओक या निवासस्थानी रवाना होणार आहेत.

भेटीगाठी मर्यादित राहण्याची शक्यता

साहेब जेव्हा कामात असतात, तेव्हाच त्यांना खरी विश्रांती मिळते. रिकामे बसणे त्यांच्या स्वभावात नाही. ते कामात असले की त्यांचे मनोबल वाढते आणि ते लवकर बरे होतात. असे असले तरी, प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेता पुढील काही दिवस त्यांच्या भेटीगाठी मर्यादित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती विठ्ठल मणियार यांनी दिली. यावेळी रुग्णालयातून बाहेर पडताना शरद पवार यांनी रुबी हॉल क्लिनिकमधील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी वर्गाचे मनापासून आभार मानले.

दरम्यान शरद पवारांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता ते पुण्यातून मुंबईला जाणार आहेत. तिथे काही दिवस ते विश्रांती घेतील. त्यानंतर ते पुन्हा राजकारणात सक्रीय होतील, अशी माहिती मिळत आहे. शरद पवारांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच डिस्चार्ज झाल्याचा आनंदही व्यक्त केला आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा